सारडा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विरोधात विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याची विद्यार्थ्यांची पोलिसात तक्रार..
अंजनगाव सुर्जी मनोहर मुरकुटे
येथील सारडा कनिष्ठ महाविद्यालयाच्या अंतर्गत सन २०२२/२३ तसेच २३/२४या सत्रात विज्ञान विभागात विद्यार्थांनी प्रवेश घेतला होता प्रवेश घेतेवेळी कनिष्ठ महाविद्यालयाने पन्नास हजार रुपयात विद्यालयात प्रवेश तसेच ट्युशन्स ,JEE/NEET परीक्षेचे क्लासेस, डिजिटल क्लासरूम रीडिंग रूम ,लायब्ररी कम्प्युटर ,लायब्ररी बोर्ड, सिबीएससी/एनसीईआरइटी फाउंडेशन इतर फॅसिलिटी पुरवण्याचे परंतु विद्यार्थ्यांचा बारावीची परीक्षा होण्यापूर्वी अभ्यासक्रम पूर्ण न करता दोन वर्षाच्या कालावधीत काही विषयात बऱ्याच तात्पुरत्या नियुक्ती वरील मानधनावरील प्राध्यापकांच्या आदल्या बदल्या झाल्या यात विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पुर्ण करण्यात बऱ्याच व सोडुन गेल्याने अडचणी निर्माण झाल्या तसेच अभ्यासक्रमाही पूर्ण करण्यात आला नाही ,या संमधात वेळोवेळी विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना तक्रार दिली परंतु त्याचे निराकरण करण्यात आले नाही उलट विद्यार्थ्यांनाच प्रॅक्टिकल्स मध्ये मार्क्स कमी टाकण्याचे, परीक्षेत बघून घेण्याचे तसेच टीसीवर लाल पेनात मार्क करण्याचे धमकवण्यात आले त्यामुळे विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा हो पर्यंत कुणाकडेही याबाबत वाच्यता केली नाही. आता मात्र विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयाकडे दिलेली फी परत करण्याची विनवणी केली इंजीनियरिंग करिता तसेच मेडिकल करिता होत असलेल्या पूर्व परीक्षेचे तयारी येथे पूर्ण होत नसल्याने ते इतर करण्याची इच्छा व्यक्त करून आमची फी आम्हाला परत द्या अशी मागणी केली असता ही मागणी पूर्ण न करता महाविद्यालयाच्या परिसरात पालक गदारोळ करत असल्याचे पोलिसांना कळविण्यात आली पोलिसांनी महाविद्यालयाचा परिसर गाठताच तिथे मात्र त्यांनी विद्यार्थ्यांची व पालकांची बाजू ऐकली असता पोलिसांनी सारडा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विरोधात लेखी तक्रार देण्याचे विद्यार्थ्यांना सुचवले त्यानुसार सर्व विद्यार्थी व पालक यांनी अंजनगावसुर्जी पोलीस स्टेशन गाठून सारडा कनिष्ठ महाविद्यालयाने विद्यार्थ्यांची फसवणुक केल्याची तक्रार केली आहे.-
-विद्यार्थ्यां कडुन पैसे घेण्यात आले नाही,आरोप खोटा आहे.या बाबत महाविद्यालयाचे प्राचार्य चौबेसरांना माहीती विचारावी असे राधाबाई सारडा महाविद्यालयाचे सचिव अमर सारडा यांनी सांगीतले तर संस्थेचे प्राचार्य चौबे सर यांचेशी संपर्क केला असता त्यांनी मी महाराष्ट्रा बाहेर आहे,मला माहीती नाही आल्यावर विषयावर बोलु आसे स्पस्ट केले.