प्रतिबंधित नायलॉन मांजा विकणाऱ्या वर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई.
ओंकार काळे / मोर्शी
स्थानिक गुन्हे शाखेला नायलॉन मांजा विक्री ची गोपनीय माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे मोर्शीतील गुजरी बाजार येथे राहणारा संकेत रामेश्वर अंबुलकर यांचे लक्ष्मी झेरॉक्स नावाच्या दुकानातून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने धाड टाकून प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त केला. त्या जप्त केलेल्या नायलॉन साहित्यामध्ये 59 बंडल नायलॉन धाग्याचे अंदाजे किंमत 25,000/- रुपये स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाई मध्ये जप्त केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोउपनि सागर हटवार, पोउपनी मोहम्मद तसलीम, बळवंत दाबणे,गजेंद्र ठाकरे, रवींद्र बावणे, भूषण पेठे, मंगेश लकडे, सचिन मसांगे, दिनेश कनोजिया, पंकज फाटे चालक विलासराव रावते यांनी करवाई केली. तसेस अमरावती ग्रामीण पोलीस प्रशासनाकडून जनतेला आव्हान करण्यात आले की त्यांनी शासनाकडून प्रतिबंधित प्लास्टिक किंवा कृत्रिम वस्तू पासून बनविलेल्या नायलॉन किंवा चायनीज मांजाचा वापर करू नये त्या ऐवजी पर्यावरण पूरक पर्यायाचा अवलंब करण्यावर भर द्यावा तसेच होलसेल व्यापारी किरकोळ व्यापारी तसेच साठवणूकदार यांनी तत्परतेने नायलॉन मांजा ची विक्री व साठवणूक करू नये. जेणेकरून मानवी जीवितास आणि पशुपक्षी यांच्या जीवितास इजा व हानी पोहचणार नाही.याची दक्षता घ्यावी. नायलॉन मांजाचा वापर होत असल्यास असे निदर्शनात आल्यास तात्काळ स्थानिक पोलिसांना कळवून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.