हटके

शिक्षिकेने ठेवले अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत शारीरिक संबंध ; पोलिसांनी केली अटक 

Spread the love

विद्यार्थ्यांच्या वडिलांवर देखील झाली कारवाई

अमेरिकी / नवप्रहार वृत्तसेवा 

                      पाश्चात्य देशात सेक्स हा विषय जनरल असला तरी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या संबंधात जी एक महिन रेषा आहे त्याचे महत्व कुठल्याही स्थितीत कमी होऊ नये याची खबरदारी शिक्षिकांनी घेणे गरजेचे आहे. पण एका शिक्षिकेने या मर्यादा ओलांडत आपल्या अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत शरीरीक संबंध ठेवले आहेत. ही घटना लीक झाल्यावर पोलिसांनी या महिला शिक्षिकेला अटक केली आहे.

 अमेरिकेतील मिसौरी येथील एका महिला शिक्षिकेला धक्कादायक प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे. एका 16 वर्षीय विद्यार्थ्याबरोबर या शिक्षिकेनं शरीससंबंध ठेवल्याचं स्पष्ट झालं आहे.

या शिक्षिकेने शाळेच्या मैदानामध्ये विद्यार्थ्याबरोबर शरीससंबंध ठेवले होते. या मुलाबरोबर शरीरसंबंध ठेवताना त्याच्या वर्गातील इतर मुलांना आजूबाजूला कोणी नाही ना यावर लक्ष देण्याचं काम दिलं होतं. मैदानामध्ये कोणी कोणत्या बाजूने येत तर नाही ना हे पाहण्याचं काम ही मुलं करत होती.

कोणत्या गुन्ह्यांखाली केली अटक?

पोलिसांनी आरोपी शिक्षिका हॅली क्लिप्टन-कारमॅकला अटक केलं आहे. ती पुलास्की काऊंटीमधील लॅकी हायस्कूलमध्ये गणित विषय शिकवते. महिला शिक्षिकेने 5 जानेवारी रोजी अटक करण्यात आली आहे. एका अल्पवयीन मुलाच्या सर्वांगीण विकासावर गदा आणण्याचा प्रयत्न करणे, बलात्कार, विद्यार्थ्याबरोबर लैंगिक शोषण करणं तसेच अल्पवयीन मुलाबरोबर छेडछाड करणे या गुन्ह्यांखाली अटक केली आहे.

एका विद्यार्थ्यानेच केला भांडाफोड

हॅली क्लिप्टनला टेक्सासमधून अटक करण्यात आली आहे. हॅली क्लिप्टनला 25 लाख डॉलर्सच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. सध्या पोलीस अधिकारी मिसौरीमध्ये हॅली क्लिप्टनला पुलास्की काऊंटी पोलिसांच्या ताब्यात देण्यासंदर्भातील प्रक्रिया करत आहेत. पोलिसांना शाळेतील एका विद्यार्थ्यानेच या शिक्षिकेच्या कृत्याबद्दलची माहिती दिली होती. आपल्या पाठीवर व्रण 16 वर्षीय विद्यार्थ्याने पोलीस अधिकाऱ्याला दाखवले. हॅली क्लिप्टनबरोबर असताना हे व्रण माझ्या पाठीवर उमटल्याचं या विद्यार्थ्याने सांगितलं.

मोबाईल दिला पण…

पोलिसांनी डिसेंबरमध्ये हॅली क्लिप्टनचा फोन तपासून पाहण्याची परवानगी मिळवली. हॅली क्लिप्टनने कोणतेही आढेवेढे न घेता आपला फोन पोलिसांकडे सोपवला. सामान्यपणे अशा प्रकरणांमध्ये आरोपी आपला फोन पोलिसांकडे सुपूर्द करण्यास नकार देतात. आपण कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही असं म्हणत हॅली क्लिप्टनने मात्र फोन पोलिसांना दिला. मात्र पोलिसांनी तिच्याकडे पासवर्ड मागितला असता तो शेअर करण्यास हॅली क्लिप्टनने नकार दिला.

मुलाच्या वडिलांनाही अटक

पोलिसांनी पासवर्ड क्रॅक करुन मोबाईल डेटा मिळवला असता हॅली क्लिप्टनचं विद्यार्थ्यांबरोबर लैंगिक संबंध असल्याचं समोर आलं. दोघेही फोनवरुन एकमेकांशी चॅट करायचे. विद्यार्थ्याच्या वडिलांना या नात्यासंदर्भात कल्पना होती. या प्रकरणामध्ये मुलाचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी त्याच्या वडिलांनाही अटक करण्यात आली आहे. वडिलांच्या परवानगीनंतरच या महिला शिक्षिकेने मुलाबरोबर संबंध ठेवल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. विशेष म्हणजे आता यासाठी ही महिला मुलाच्या वडिलांना काही पैसे देत होती का याचा तपास पोलीस करत आहेत. या मुलाला सुधारणागृहामध्ये पाठवण्यात आलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close