एस ओ एस येथे हॅप्पी पॅरेटिंग वर्कशॉप चे आयोजन येऊ

धामणगाव रेल्वे:-
प्रतिनिधी -राहुल चांभारे
दत्ताजी मेघे बाल कल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालीत स्कूल ऑफ स्कॉलर्स येथे दिनांक २४/०२/२०२४ शनिवारला
हॅप्पी पॅरेटिंग वर्कशॉप चे पालकांसाठी आयोजन करण्यात आले होते.
या वर्कशॉपला प्रमुख अतिथी
म्हणून डॉ. सारिका गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ सारिका गायकवाड यांनी आपली मूले चंचल ,अति चंचल आणी हायपर ऍक्टिव्ह असतिल तर त्या मुलांना कशा प्रकारे जपायचे व हॅप्पी पॅरेटिंग कशी करावी
याबददल मार्गदर्शन केले. या वर्कशॉपला नर्सरी ते वर्ग दुसरीच्या विदयार्थ्यांच्या पालकांची उपस्थीती मोठया प्रमाणात होती . मुख्याध्यापिका के साई नीरजा व पर्यवेक्षिका शबाना खान यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षिका प्रणिता जोशी, रेणूका सबाने, वर्षा देशमुख, वृषाली काळे, राणी रावेकर, आकांक्षा महल्ले, हर्षदा ठाकरे, प्राजक्ता दारुंडे यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.