टेक ऑफ करताना विमान कोसळले ; 18 क्रु मेम्बर्स व्हा मृत्यू
एका क्रु मेम्बर चे अख्खे कुटुंबच संपले
19 क्रु मेम्बर्स ला घेऊन काठमांडूहून पोखरा येथे चाललेल्या सूर्या एअर लाईन्स चे विमान टेक ऑफ करतांना कोसळल्याने 18 लोकांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार क्रू मेंबर्ससह 19 प्रवासी या विमानाने प्रवास करत होते.
नेपाळच्या काठमांडू परिसरात विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आहे. विमान कोसळल्यानंतर आग लागली आणि मोठं नुकसान झालं आहे. सूर्या एअरलाईन कंपनीचं विमान काठमांडूहून पोखराला जाणारं विमान कोसळलं आहे. या दुर्घटनेच्या फक्त काही मिनिटं आधीचा व्हिडीओ समोर आला आहे.
त्रिभुवन विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच अनिंयंत्रित झालं आणि सकाळी अकराच्या सुमारास ते कोसळलं. विमान कोसळण्यापूर्वी हेलकावे खात असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, विमानाने त्रिभुवन विमानतळावरून उड्डाण केले. त्यानंतर टेक ऑफ करत असताना विमान अनियंत्रित झाले. विमान जमिनीवर कोसळल्यानंतर भीषण आग लागली. आग आटोक्यात आणण्यात आलीय.
क्रु मेम्बर चे अख्खे कुटुंबच संपले –
क्रू मेंबर मनुराज शर्मा आपल्या पत्नी आणि मुलासह या विमानातून प्रवास करत होते.
‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, अपघातग्रस्त विमानात फ्लाइट मेंटेनन्स कर्मचारी मनुराज शर्मा पत्नी प्रिजा खतिवडा आणि चार वर्षांचा मुलगा अधिराज शर्मा यांच्यासह प्रवास करत होते. या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला आहे. प्रिजा ही देखील सरकारी कर्मचारी होती आणि ऊर्जा मंत्रालयात असिस्टंट कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत होती. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी 17 जण सूर्या एअरलाइन्सचे कर्मचारी होते.
या दुर्घटनेत 37 वर्षीय पायलट एम आर शाक्य याचा जीव बचावला असून क्रॅश साईटवरुन त्याला रेस्क्यू करण्यात आले आहे. अपघातग्रस्त विमान 2003 मध्ये बनवण्यात आले होते. 21 वर्ष जुने विमान दुरुस्तीकरीता काठमांडू येथून पोखरा येथे चालले होते. मात्र उड्डान घेताच विमान विमानतळावरच कोसळले आणि आगीच्या भक्षस्थानी गेले.
धावपट्टीवरुन उड्डान घेत असतानाच विमान कोसळून 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नेपाळच्या विमानतळावर आज सकाळी घडली. या दुर्घटनेत पायलट बचावला असून तो जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.