शेती विषयक

आर्वी परिसरातील जंगली प्राण्यांच्या उच्छादामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

Spread the love

पिकाची केली जाते नासाडी

शेतकरी राजा मेटाकुटीला

आर्वी / प्रतिनिधी

आर्वी लगतच्या परिसरातील बोथली,बेढोना,मांडला, खानवाडी, चिंचोली, दहेगाव,गुमगाव, तरोडा, उमरी,टाकरखेड, हरदोली इत्यादी शेत शिवारात जंगली वराह, रोहि यांच्या मुळे पिकांची नासाडी होत आहे. उभ्या पिकात शिरुन तूर, चना,गहू, भूईमुंग या पिकाला हाणी पोहचत आहेत.
यामुळे आर्वी परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी भर पडत आहे. या भागातील वन्यप्राण्यांचा तात्काळ वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहेत. यंदाच्या वर्षी खरीप हंगामात सततच्या मुसळधार पावसाचा आर्थिक फटका शेतकरी बांधवांना सहन करावा लागला. खरिपाच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी आर्वी लगतच्या परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी पीक घेण्याचे निश्चित केले आहेत. सध्या पिकांची योग्य निगा घेतल्याने आता पिकांची बऱ्यापैकी वाढ झाली आहे.परंतु आता आर्वी लगतच्या सभोवतालच्या परिसरात मोठ्या संख्येने जंगली वराह, रोहि असुन हे कळपा-कळपाने उभ्या पिकांना नेस्तनाबूत करून पिकाची नासाडी करीत आहेत. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. याबाबतीतची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देत जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी असतांनाही संबंधित वनविभागाचे अधिकारी दुर्लक्ष करून थातुरमातुर कारवाई करण्यातच धन्यता मानतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनी नेमके आता करायचे तरी काय?कोणाकडे मदतीसाठी याचना करावी, असा यक्षप्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे. त्यामुळे आता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसान ग्रस्त शेतकरऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जावुन नुकसान ग्रस्त शेतकरऱ्यांना शासकीय मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या वनविभागातिल अधिकाऱ्यांनी शेतकरी बांधवाच्या मदतीला येवून नुकसान ग्रस्त शेतकरी बांधवांना जंगली प्राण्यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी काटेरी कुंपण लावून द्यावे, अशी मागणी शेतकरी बंधुची आहे.

माझे शेत शिरपूर रोडवर असुन माझ्या शेतातील रब्बी पिकांना रानडुक्कर, रोही नुकसान पोहचवून पिकांची नासाडी करीत आहेत. त्यामुळे आमचे आर्थिक नुकसान होत आहेत. वनविभागाचे अधिकाऱ्यांनी जंगली श्वापदापासून सुटका करण्यासाठी ठोस पाऊस उचलून आम्हाला मदतीचा हातभार लावावा. शेतकरी बांधवाच्या समस्या समजून घ्याव्या.
प्रमोद कहारे
शेतकरी आर्वी

माझे शेत हरदोली शेत शिवारात असुन माझ्या शेतात जंगली प्राण्यांचा धुमाकूळ असतो. माझा खरिपाच्या पिकांची नासाडी करणारे जंगली प्राणी रब्बी पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान करीत आहेत. त्यामुळे शेतात लावलेला पैसा निघणे, कठीण आहे. त्यामुळे वनविभागाने जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करून
शेतकरी बंधुना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे.
निलेश टाके
हरदोली आर्वी(शेतकरी)

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close