शेती विषयक

पिक विमा योजनेत संत्रा, मोसंबी व फळ पिकांचा समावेश करा.

Spread the love

 

नुकसानीचे पंचनामे करून शेतक-यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या.

वरूड/तूषार अकर्ते

सन २०२३ चे १ रुपया पिक विमा योजनेत संत्रा, मोसंबी व फळ पिकांचा समावेश करण्यात यावा तसेच वरुड मोर्शी तालुक्यात अतिवृष्टी जाहीर करून शेतक-यांचे झालेले नुकसानीचे पंचनामे करून शेतक-यांना तात्काळ नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यात यावी,अशा मागणीचे निवेदन वरुड पंचायत समितीचे माजी सभापती विक्रम ठाकरे यांचे नेतृत्वात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना तहसीलदार वरुड यांचे मार्फत देण्यात आले.
शासनाने सन २०२३ मध्ये खरीप हंगामाकरिता शेतक-यांकरिता १ रुपया मध्ये विमा योजना अमलात आणली परंतु या मध्ये संत्रा, मोसंबी व फळे या पिकांचा समावेश नाही.वरुड मोर्शी तालुक्यात सर्वात जास्त मोसंबी, संत्रा फळे असून बाकीचे पिकांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे आपले शासन निर्णयामध्ये संत्रा, मोसंबी व इतर फळे यांचा पिक विम्यात समावेश नाही. त्यामुळे वरुड, मोर्शी तालुक्यातील शेतक-यांवर फार मोठा अन्याय होत आहे. त्यामुळे शेतक-यांवर अन्याय होऊ नये करिता १ रुपया पिक विमा मध्ये शासन निर्णयात समावेश करून शेतक-यांना न्याय द्यावा. तसेच वरुड, मोर्शी तालुक्यात या आठवडयात फार मोठे प्रमाणत पाऊस झाला काही भागात ढगफुटी सुद्धा झाली त्यामुळे शेतक-यांचे फार नुकसान झाले. काही शेती पाण्याच्या प्रवाहाने खरडून नेले तर काही शेती मध्ये पाणी साचल्याने पिके खराब झाली. यामध्ये बरेच मोठे प्रमाणत शेतकरी यांचे नुकसान झाले सततचे नापिकीमुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आहे व दर वर्षी शेतक-यांना कमी पिक तर काही शेतमालाला कमी भाव यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. तरी शेतक-यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता वरुड मोर्शी तालुक्यामध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावे व शेतक-यांना आर्थिक मदत देण्यात यावी व अतिवृष्टी जाहीर करावी अशा मागणीचे निवेदन विक्रम ठाकरे यांचे नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना तहसीलदार वरुड यांचे मार्फत देण्यात आले. या वेळी विक्रम ठाकरे, बाबाराव बहुरूपी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र उर बबलू पावडे सह तालुक्यातील शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close