क्राइम

पुन्हा एकदा या शिक्षकांनी शिक्षकी पेश्याला फासली काळिमा 

Spread the love

या कारणाने चौथ्या वर्गात शिकणाऱ्या  मुली घाबरत होत्या शाळेत जायला

अकोला / विशेष प्रतिनिधी

         अकोला जिल्ह्यात अति दुर्गम भागात असलेल्या एका शाळेत शिकविणाऱ्या  53 वर्षीय आणि 45 वर्षीय शिक्षकांनी शिक्षकी पेश्याला काळिमा लावली आहे. या दोघांनी 4  इयत्तेत शिकणाऱ्या चार मुलींवर लैंगिक अत्याचार केले आहे. मुली शाळेत जायला घाबरत असल्याने पालकांनी आस्थेने विचारपूस केल्यावर हा किळसवाणा प्रकार उघड झाला आहे. पालकांच्या तक्रारी नंतर पोलिसांनी या दोघांवर बाळ लैंगिक अत्याचार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

 सहाय्यक शिक्षक सुधाकर ढगे (वय ५३) आणि राजेश तायडे (वय ४५) यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अकोल्यापासून 30 ते 40 किमी अंतरावर असणाऱ्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीपर्यंतच वर्ग आहेत.

द्विशिक्षकी असलेल्या या शाळेत चार मुली आणि पाच मुलं शिकतात. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत दोन्ही नराधम शिक्षकांनी मुलींचा लैंगिक छळ केला. शिक्षकी पेशाला काळिमा फास त्यांनी चार मुलींवर दोन महिने लैंगिक अत्याचार केले.  शिक्षकांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला घाबरून मुलींनी शाळेत जाणं बंद केलं.

मुली शाळेत का जात नाही याबद्दल पालकांनी विचारणाही केली. पण त्या भीतीने काहीच बोलत नव्हत्या. शेवटी एका मुलीने पालकांना खरं कारण सांगताच त्यांना धक्का बसला. इतर मुलीच्या पालकांना याबाबत माहिती दिली आणि त्यांच्यासोबतही असं घडल्याचं समोर आलं.

शेवटी पालकांनी पोलिसात धाव घेत शिक्षकांविरोधात तक्रार दाखल केली. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दोन्ही शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे. या शिक्षकांवर बडतर्फीची कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. गटशिक्षण अधिकाऱ्यांना कारवाईचा अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर दोन्ही शिक्षकांना ६ एप्रिलपासून बडतर्फ करण्यात आले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close