विदेश

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक ; तुरुंगातील फोटो व्हायरल 

Spread the love

चौथ्यांदा झाली अटक 

नवप्रहार मीडिया 

           निवडणुकीच्या निकालात घोटाळा करण्याच्या आरोपात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आली असून जॉर्जियातील फुल्टन कॉटनी तुरुंगाने त्यांचा तुरुंगातील फोटो प्रसिद्ध केला आहे. या वर्षात त्यांना चौथ्यांदा अटक झाली आहे.

राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीतील घोटाळ्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. जॉर्जियातील फुल्टन कॉटनी तुरुंगासमोर ट्रम्प यांनी आत्मसमर्पण केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर चार वेगवेगळे आरोप ठेवण्यात आले असून वकिलांनी 45 पानांचे आरोप पत्र दाखल केले आहे.

2020 च्या यूएस निवडणुकीचे निकालात घोटाळा करण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांची चौकशी करणाऱ्या विशेष वकिलाने 45 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये ट्रम्प यांच्यावर 4 आरोप करण्यात आले होते. 1- युनायटेड स्टेट्सची फसवणूक करण्याचा कट, 2- अधिकृत कार्यवाहीमध्ये अडथळा आणण्याचे षड्यंत्र, 3- अधिकृत कार्यवाहीमध्ये अडथळा आणणे आणि अडथळा आणण्याचा प्रयत्न करणे. 4- हक्कांविरुद्ध कट.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close