सामाजिक

अग्नितांडवात सहा लोकांचा जळून मृत्यू

Spread the love

अग्नितांडवात सहा लोकांचा जळून मृत्यू

चिमुकली सह एकाच कुटुंबातील तिघांचं आणि वयोवृद्ध महिलेचा समावेश

नवी मुंबई / विशेष प्रतिनिधी

          देश दिवाळी च्या उत्सवात मग्न असताना नवीउकाबाईत मात्र दुर्दैवी घटना घडली आहे येथे दोन ठिकाणी लागलेल्या आगीत सहा लोकांचा जळून मृत्यू झाला आहे.यात एकाच कुटुंबातील चिमुकलीसह तिघांचा आणि एका वयोवृद्ध महिलेचा समावेश आहे. याघटनेने परिसरात हळहळ विकत करण्यात येत आहे.

वाशी येथील रहेजा रेसिडन्सी या इमारतीला लागलेल्या आगीमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सहा वर्षीय चिमुकलीचा देखील समावेश आहे. तर, याच घटनेत ८४ वर्षांच्या कमला हिरल जैन यांना देखील मृत्यूला सामोरे जावे लागले. कमला जैन या आजारी असल्यामुळे अंथरूणाला खिळून होत्या. आग लागल्यानंतर त्यांच्या घरातील इतर सदस्य बाहेर पडले. मात्र, कमल जैन यांना उठून बाहेर जाता आले नाही. याठिकाणी पसरलेल्या धूरामुळ श्वास गुदमरून त्याच आगीत होरपळून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दिवाळी सणाला सुरूवात झाली असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. मोठ्या आनंदाने सर्वजण दिवे, पणत्या, आकाशकंदील तसेच विद्युत रोषणाईने घराची सजावट करीत आहेत. तसेच अनेकजण फटाक्यांची आतषबाजी करत उत्साहात दिवाळी सण साजरा करत आहेत. मात्र, हीच दिवाळी नवी मुंबईकरांसाठी दुख:द ठरली. मंगळवारी मध्यरात्री १२ वाजून ४० मिनीटांच्या सुमारास रहेजा रेसिडेन्सीमध्ये दहाव्या मजल्यावर आग लागली. त्यानंतर ही आग वेगाने पसरत गेली. ही आग ११ व्या आणि १२ व्या मजल्यापर्यंत पोहचली.

तीनही मजल्यावर आगीचे डोंब दिसत होते. भीषण स्वरुपात लागलेल्या आग विझवण्यासाठी वाशी, नेरुळ, ऐरोली आणि कोपरखैरणे येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाचे तब्बल ४० जवान ही आग विझविण्यासाठी आणि बचावकार्यात सहभागी झाले होते. या दुर्घटनेत जवळपास १४ जण जखमीही झाले. या सर्वांना हिरानंदानी आणि एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या घटनेत १२ व्या मजल्यावरील एकाच कुटुंबातील सहा वर्षीय वेदिका सुंदर बालकृष्णन, तिचे वडील सुंदर बालकृष्णन (वय ४४) आणि आई पूजा राजन (वय ३९) यांचा देखील मृत्यू झाला. तर १० व्या मजल्यावरील ८४ वर्षीय कमला हिरल जैन यांना आजारपणामुळे उठता येणे शक्य नव्हते. दरम्यान या घटनेत त्यांचा देखील दुर्देवी मृत्यू झाला.

कामोठ्यातील मायलेकींचा आगीत मृत्यू

पनवेलमधील कामोठे येथे सोमवारी पहाटे सेक्टर ३६ मधील अंबे श्रद्धा इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली. अचानक लागलेल्या आगीत आई आणि मुलीचा जळून मृत्यू झाला. अशातच ऐन दिवाळीत सहा जणांचा मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जाते आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close