हटके

एक शापीत नदी जिच्या पाण्याला हात लावायला देखील घाबरतात लोकं

Spread the love

                      डोंगर-दरी यांच्या मधातून वाहणार नदीचे निखळ आणि स्वछ पाणी पशु – पक्षी नाही तर मानवाला देखील आपल्या कडे आकर्षित करतात. जमिनीला सुजलाम सुफलाम करण्याची ताकद नदीच्या पाण्यात आहे.  नदीच्या पात्रांतून वाहणाऱ्या निर्मळ पाण्याला स्पर्श करण्याचा मोह कोणाला होणार नाही. पण देशात एक अशी नदी आहे की जिचे पाणी पिणे तर लांबच तिला स्पर्श करयाला देखील लोकं घाबरतात. चला तर मग जाणून घेऊन या काय आहे या नदीचे नाव आणि कुठे हे ही नदी? 

 इतिहासात आपण डोकावलं तर लक्षात येईल की नद्यांना देवी म्हटलं गेलं आहे. त्यामुळे भारतात नद्यांना पवित्र मानलं जातं. जिथे येऊन लोक पूज करतात. तर काही लोक आपले पाप धूवून काढतात. तसेच शेतीशी संबंधित सर्व प्रकारच्या उद्योग आणि कामांमध्ये नदीची उपयुक्तता प्रत्येकाला माहिती आहे.

नद्यांशिवाय कोणत्याही मानवी संस्कृतीची कल्पना करणेही अवघड आहे. पण असं असलं तरी देखील भारतात एक अशी नदी आहे जिला लोक स्पर्श करत नाहीत. या नदिला शापित नदी मानली जाते. या नदीचं नाव आहे कर्मनाशा.

उत्तर प्रदेशात कर्मनाशा नावाची नदी वाहते, तिचे पाणी सामान्य लोक वापरत नाहीत. ही नदी शापित आहे असे मानले जाते. जर कोणी तिचे पाणी वापरले तर त्या व्यक्तीचे सर्व कामे बिघडू लागते अशी मान्य आहे, त्यामुळे आजही अनेक लोक कर्मनाशा नदीचे पाणी वापरत नाहीत. कर्मनाशा हा कर्म आणि नशा या दोन शब्दांपासून बनलेला आहे.

त्याचा शाब्दिक अर्थ घेतला तर चांगल्या कर्मांचाही नाश होणे. म्हणून तिच्या पाण्याला कोणी हात लावत नाही आणि पित देखील नाही. सोनभद्र, चंदौली, वाराणसी आणि गाझीपूरमधून वाहणारी ही नदी बक्सरमधील गंगा नदीला मिळते. ही नदी राजा हरिश्चंद्राचे वडील सत्यव्रत यांच्या लाळेपासून बनली होती असे पौराणिक कथेत मानले जाते.

असे म्हणतात की, एकदा सत्यव्रताने आपले गुरू वशिष्ठ यांच्याकडे मानवी शरीरासह स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु गुरु वशिष्ठांनी सत्यव्रत यांना ती नाकारली. सत्यव्रत यांनी ही इच्छा गुरु विश्वामित्रांसमोर व्यक्त केली. विश्वामित्राने आपल्या तपश्चर्येच्या बळावर सत्यव्रताला शारीरिकरित्या स्वर्गात पाठवले. यावर इंद्राला खूप राग आला आणि त्याने सत्यव्रताचे शरीर पृथ्वीकडे पाठवले. गुरु विश्वामित्रांनी सत्यव्रताचे शरीर स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामध्ये आपल्या ध्यानशक्तीने थांबवले यानंतर इंद्र आणि विश्वामित्र यांच्यात मोठे युद्ध झाले आणि यादरम्यान सत्यव्रताचे शरीर आकाशात उलटे लटकत राहिले आणि त्याच्या तोंडातून लाळ बाहेर पडू लागली. या लाळेपासून कर्मनाशा निर्माण झाल्याचं सांगितलं जातं. सत्यव्रताच्या हुशारीसाठी गुरु वशिष्ठांनी त्याला चांडाल होण्याचा शाप दिला होता, त्यामुळे या नदीलाही शाप मिळाला होता.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close