हटके

समय सुचकता दाखवत पायलट ने उलटे केले विमान आणि आकाशात अनर्थ टळला 

Spread the love

नवी दिल्ली  / नवप्रहार डेस्क 

              लढाऊ विमान आणि सैन्य विमान यांना तुम्ही हवेत कसरत करताना बघितले असतील .पण प्रवाशी विमानाला तुम्ही कधी हवेत उलटे होतांना पाहिले आहे काय ? पण असे जर झाले तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. परंतु असे झाले आहे. आणि असे दोन विमानात हवेत होणारी टक्कर टाळण्यासाठी झाले. पायलट ने दाखवलेल्या प्रसांगवधानामुळे आकाशात अनर्थ टळला.

ज्यात दोन विमान आमनेसामने आले. तुम्हाला वाचूनच धक्का बसेल दुसऱ्या विमानाला वाचवण्यासाठी विमानाच्या पायटलनं चक्क आकाशात विमान उलटं केलं.

आकाशात दोन विमानं आमनेसामने आल्याचा हा व्हिडीओ पाहून सगळ्यांना धडकी भरली आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक विमान टेकऑफ करतं आहे तर एक लँड होतं आहे. दोन्ही विमानांमध्ये खूप कमी अंतर आहे. विमानांची आता आकाशात टक्कर होणार असंच वाटतं. पण तितक्यात असं काही घडतं ज्याचा आपण स्वप्नातही विचार केला नसेल.

एक विमान आकाशात उड्डाण घेतं, त्याच्या समोरून दुसरं विमान जमिनीवर लँड होण्यासाठी येतं. टेकऑफ करणारं विमान सरळ दिशेनं आकाशात जात असतं त्याच्यासमोर लँड होणार विमान येतं. त्यांची टक्कर होणार तोच…

लँड होणाऱ्या विमानाचा पायलट अख्खं विमान उलटं करतो. एक पंख वर आणि एक पंख खाली अशा स्थितीत हे विमान असतं. यामुळे दोन्ही विमान सुखरूप राहतात. विमानांची टक्कर होता होता राहते.
हा व्हिडीओ नेमका कधीचा आणि कुठला आहे माहिती नाही. पण व्हिडीओ पाहिल्यानंतर काही लोकांनी कमेंट्समध्ये पायलट्सचं कौतुक केलं आहे. तर अनेकांनी हा व्हिडीओ एआय जनरेटेड असल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला काय वाटतं, यावर तुमची प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close