संगीत क्षेत्रातील कोहिनूर हिरा अमीन सयाणी
मेरी आवाज ही मेरी पहचान
70च्यी दशकात आसमंतात घुमलेला स्वराचा आवाज, बहनो और भाईओ,आप सुन रहे है..आजही संगीत प्रेमीच्या हदयात घर करून आहेत. अमीन सयाणी यांच्या या धारदार आवाजाने संगिताची व गाण्याची आवड असलेल्यांना,अक्षरशः वेड लागले होते, ज्या आवाजाने त्यांना पदमश्रीने सन्मानित केले तो आवाज आता आसमंतात हळुवार विरला आहेत. त्यांचे निधन झाले, त्यामुळे आम्ही पोरके झाले आहोत. त्यांनी गीत, संगिताची नितांत पणे पुजा केली. त्यामुळेच कदाचित त्यांना91 वर्षाचे अमुल्य आयुष्य लाभले. त्यांच्या निधनाने पंतप्रधानांनी दुख व्यक्त केले आहेत. तसेच अनेक मोठ्या मान्यवरांनी दुख व्यक्त केले आहेत.70च्या संपूर्ण दशकात बुधवारच्या सायंकाळी त्यांचा सदाबहार संगिताचा कार्यक्रम ऐकण्यासाठी संपूर्ण रस्तेही ओसाड पडायचे. केवळ भारतातच नव्हे तर अनेक देशांमध्ये त्यांच्या बिनाका गीतमाला या कार्यक्रमाचा मोठा चाहता वर्ग होता… एका मुलाखतीत सयाणी म्हणाले होते, या देशातील संगिताने देशाला तुटण्यापासुन वाचवण्यासाठी मोठा पुढाकार घेतला आहेत, त्या अर्थाने त्यांचे कार्य खूप मोठे मानले पाहिजे.1952 मधि रेडिओ सिलोनवर बिनाका गितमाला सुरू झाला.3डिसेंबर ला त्यांचा पहिला कार्यक्रम प्रसारित झाला, तेव्हा हे प्रसारण कोलंबो येथून होत असे. लवकरच या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची लोकप्रियता संपूर्ण आशिया खंडात पसरली. तसे पाहिले तर सयाणी हे अवघ्या 9वर्षाचे होते, तेव्हाच त्यांचे ज्येष्ठ बंधू त्यांना आँल इंडिया रेडिओ च्या बाँबे स्टेशनला घेऊन गेले होते. आपला आवाज रेकॉर्ड करुन स्वतः ऐक असा मोलाचा सल्ला त्यांच्या भावांनी त्यांना दिला.. तो त्यांनी निमुटपणे ऐकला आणि म्हणाले माझा आवाज असा, त्यांना तो मुळीच आवडला नव्हता. परंतु तेव्हापासून त्यांचे नाते रेडिओ शी जुळले, ते तब्बल 2003 पर्यंत अतूट होते.
आधी बिनाका गितमाला आणि नंतर सिबाका गितमाला म्हणून हा कार्यक्रम चालला. त्यात थोडा बदल करून 1994ते 2001आणि त्यानंतर एफएमच्या माध्यमातून अमेरिका आणि लंडनमध्ये ही तो श्रोत्याकडुन ऐकला जात असे. वस्तुतः पायदान नंबर 1वर सर्वात जास्त कुणाची गाणी राहीली असेल तर ती प्रसिद्ध गायिका, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची होती. तब्बल एकोणीस वेळा त्यांच्या या गाण्यांनी या कार्यक्रमातील क्रमांक 1चे स्थान निर्विवाद पटकावले. त्या खालोखाल मोहम्मद रफी आणि सयाणी यांचे मगत्र किशोरदा यांची गाणी राहीली आहेत. त्यांच्या या महान संगीत सेवेला रसिक कधीही विसरणार नाहीत, त्यांना माझ्या अविनाश टाके परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली, अर्पण .