क्राइम
धामणगाव रेल्वे ( अमरावती) येथे1500 रु. लाच घेताना पटवाऱ्यास अटक

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
शेतीचा फेरफार रुजू करण्यासाठी शेतकऱ्याला 1500 रुपयांची लाच मागणाऱ्या लाचखोर तालाठ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहिती नुसार आलोसे प्रफुल पांडुरंग थोरात वय 44 यांनी तक्रारदारास शेतीच्या खरेदीचा फेरफआर घेण्यासाठी लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने यावबत ACB कडे तक्रार दाखल केली होती. त्यावरून ACB च्या चमूने आज तळणी येथील तलाठी कार्यालयात 2. 51वा. तलाठी प्रफुल थोरात यांना 1500 रु. ची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत एसडीपीओ मंगेश मोहोड, पीआय चित्रा मेसरे, प्रमोद रायपुरे, शैलेश कडू, निलेश राठोड , जनबंधु यांनी सहभाग घेतला.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1