क्राइम

घरात घुसून मुलीवर अत्याचार, व्हिडीओ बनवून पालकांना पाठवला 

Spread the love

पुणे / नवप्रहार डेस्क 

 एका अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार केल्यानंतर त्या अत्याचाराचा शूट केलेला व्हिडीओ व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी एका तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

                    याला विकृती म्हणावं की काही तरी हटके करण्याची मानसिकता ? . एका तरुणाने घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो काढून त्याने मुलीच्या आईवडिलांना आणि नातेवाईकांना पाठवले. पोलिसांनी या तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार डिसेंबर 2022 ते मार्च 2023 या कालावधीमध्ये पुणे शहरातील उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.

या प्रकरणी 17 वर्षीय पीडित मुलीने शुक्रवारी (दि.5) उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर सोहेल ताज शेख (वय-22 रा. यशोदिप चौक, वारजे माळवाडी) याच्यावर भादंवि 376/2/एन, 504, 506, 507, पोक्सो अ‍ॅक्ट, आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोहेल शेख याला मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन तो मुलीच्या घरात घुसला. आरोपीने पीडित मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. शारीरिक संबंध ठेवताना त्याने पीडित मुलीचे नग्न अवस्थेतील फोटोसह व्हिडीओ त्याच्या मोबाईलमध्ये शूट केला. त्यानंतर आरोपीने वारंवार पीडित मुलीवर अत्याचार केले. तसेच शारीरिक संबंध ठेवताना काढलेले व्हिडीओ आणि फोटो पीडित मुलीच्या आई-वडीलांच्या व नातेवाईकांच्या व्हॉट्सॲपला पाठवून व्हायरल केले. ही बाब पीडित मुलीला समजताच तिने पोलीस गाठत सोहेल शेखच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close