सामाजिक

गणेशोत्सव व ईद च्या पार्श्वभूमीवर घाटंजी पोलीसांचे पथसंचलन

Spread the love

 

 

सनासुदीच्या काळात तालुक्यात शांतता नांदावी यासाठी घाटंजी पोलिस विभाग सज्ज

 

घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार 

घाटंजी -सध्या सुरू असलेल्या गणेशउत्सव व हिंदू मुस्लिम दोन्ही धर्माचे सण एकत्र असल्याने मिरवणूक व सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी शहरासह तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व सशक्त पोलिस बल पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव विसर्जनाच्या व येणाऱ्या ईद सण-उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर घाटंजी शहरातील पोलिस ठाण्यापासून सूरू करण्यात आलेले पथ संचालन संत मारोती महाराज देवस्थान, इंदिरा चौक,जामा मस्जिद, शिवाजी चौक,राम मंदिर ते पोलिस स्टेशन अशा मुख्य रस्त्यावरून पथसंचलन मार्गक्रमण करण्यात आले. यातून जनतेच्या मनात सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करण्यात आला.

                    सदर पथसंचलन उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.रामेश्वर वेंजणे यांच्या मार्गदर्शनाखाली घाटंजी ठाण्याचे पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर,पोलिस उपनिरीक्षक विलास सिडाम,पोलीस उपनिरीक्षक शशिकांत नागरगोजे,पोलीस कर्मचारी,महिला पोलिस कर्मचारी व होमगार्ड यांची उपस्थिती होती.या निस्तब्ध पथसंचल व्दारा जनतेत सनासुदीच्या काळात तालुक्यात शांतता नांदेल ही आशा पल्लवीत झाली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Pande Sanjay

Related Articles

Back to top button
Close
Close