भूमिपुत्र चे संस्थापक विष्णुपंत भुतेकर यांचा सत्कार
वशींम प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या सोयाबीन, तुर, कापसाचे भाव
व शेतकऱ्यांना कृषी पंपाला मोफत व मुबलक विज मिळावी म्हणून रिसोड ते वाशिम अक्रोश पदयात्रा काढून शेतकऱ्यांचा लढा सातत्यपूर्ण लढणारे भूमिपुत्र चे संस्थापक अध्यक्ष मा. विष्णुपंत भुतेकर यांचा शेलु येथे सत्कार करण्यात आला.
सेलू बाजार येथील शिवसेना तालुका संघटक बबनरावजी सावके यांच्या कार्यालयात आमचे जुने सहकारी तथा मार्गदर्शक भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा जि.प वाशिम चे माजी विरोधी पक्ष नेते व रिसोड शिवसेना माजी तालुकाप्रमुख विष्णुपंत भुतेकर यांनी कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता यावेळी शाल श्रीफळ व गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला . तसेच भूमिपुत्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भाऊ अवचार यांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला या भेटीदरम्यान जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला . विष्णुपंत भुतेकर यांनी या भेटीदरम्यान उपस्थित सर्व जुन्या मित्र परिवाराला आयुष्यात माणसं जपा हा संदेश दिला . यावेळी शिवसेना तालुका संघटक बबनरावजी सावके आमची ज्येष्ठ मार्गदर्शक मुकुंदराव काक जायभाये, सतीश सावके, भूमिपुत्र मंगरूळनाथ तालुकाध्यक्ष गुणवंतराव ठाकरे, गणेश राऊत, विजय सावके, सचिन राऊत, चंद्रशेखर जायभाये, रामराव वाघमारे, राजाभाऊ बाजड, शाम टेलर यांच्यासह इतरांची उपस्थित होती .