ब्रेकिंग न्यूज

प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून रेल्वे ट्रॅक वर कोसळली ; ४ प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जखमी

Spread the love
दौसा (राजस्थान ) / नवप्रहार् मीडिया 
                 राजस्थान मधील दौसा येथून ऐक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथे प्रवाशांनी भरलेली एक बस पुलावरून रेल्वे ट्रक वर कोसळल्याने ४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ४० हून अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रं. २१ वर सकाळी २.१५ वां. घडल्याचे समजत आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात धडल्याचे बोलल्या जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री २.१५ च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग-२१ वर हा भीषण अपघात झाला. हरिद्वारहून जयपूरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले, त्यामुळे बस लोखंडी रेलिंग तोडून कल्व्हर्टवरून खाली पडली. जयपूर दिल्ली रेल्वे मार्गावर बस थेट रुळावर पडली. कल्व्हर्टवरून बस
रेल्वे रुळावर पडल्याची माहिती मिळताच पोलीस व रुग्णवाहिका वाहने घटनास्थळी दाखल झाले, तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले.
या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर डीएमसह सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. राष्ट्रीय महामार्ग-२१ वर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. येथे एक प्रवासी बस
कल्व्हर्टचे रेलिंग तोडून खाली रेल्वे रुळावर पडली,
त्यामुळे गाड्यांची वाहतूकही ठप्प झाली आहे.
या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातानंतर डीएमसह सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. राष्ट्रीय महामार्ग-२१ वर हा अपघात
झाल्याचे सांगण्यात येत आहे. येथे एक प्रवासी बस
कल्व्हर्टचे रेलिंग तोडून खाली रेल्वे रुळावर पडली,
त्यामुळे गाड्यांची वाहतूकही ठप्प झाली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close