सामाजिक

१२ जानेवारीला भद्रावतीत माँ जिजाऊ ,सावित्रीबाई फुले ,माता रमाई आंबेडकर, फातिमा शेख, अहिल्याबाई होळकर संयुक्त जयंती समारोहाचे आयोजन.

Spread the love

चंद्रपूर / प्रतिनिधी

कोणत्याही समाजाची प्रगती त्या त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीवरून मोजली पाहिजे असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. हाच विचार प्रेरणादायी ठेवून भद्रावती येथील विविध स्तरावर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी एकत्रित येत स्वराज्य जननी माँ साहेब जिजाऊ, स्त्रीमुक्तीच्या अग्रणी माता सावित्रीबाई फुले, त्याग मूर्ती माता रमाई आंबेडकर, पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख, राणी अहिल्याबाई होळकर यांचा संयुक्त जयंती समारोह जय भीम महिला संघटन भद्रावती द्वारा दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ रोज सोमवारला डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, जुने बस स्थानक भद्रावती येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित केला असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कविता मडावी सामाजिक कार्यकर्त्या राजुरा, प्रमुख अतिथी म्हणून नयोमी साटम (म .पो. से.) उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा प्रामुख्याने उपस्थित राहणार असून कार्यक्रमात सत्कारमूर्ती म्हणून अविनाश मेश्राम सहाय्यक पोलीस निरीक्षक, मुल यांच्या सामाजिक सहभागाबद्दल सन्मान करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महिला संघटनेने केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close