क्राइम

पॅरोल वर बाहेर येताच त्याने बायकोवर झाडल्या सात गोळ्या 

Spread the love

बिरधाना (युपी) / विशेष प्रतिनिधी

पॅरोल वर बाहेर येताच त्याने आपल्या बायकोवर सात गोळ्या झाडल्याचा  भयंकर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे आरोपी हत्या प्रकरणात जेल मध्ये होता.आणि त्याला पॅरोल मंजूर झाली होती.

भररस्त्यातच आरोपीने आपल्या पत्नीवर गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अंजली असं मृत पत्नीचं नाव आहे. उत्तर प्रदेशातील बिरधाना परिसरातील ही घटना नेमकी काय आहे, जाणून घेऊया.

संजय असं या आरोपीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमधील वादातून संजयने भररस्त्यात अंजलीवर गोळ्या झाडल्या आणि तो घटनास्थळावरून फरार झाला. विशेष म्हणजे, आरोपी संजय हा सराईत गुन्हेगार असून तो यापूर्वीच एका हत्येच्या गुन्ह्यात तुरुंगात होता. मागील होळीच्या वेळी त्याने दुजाना परिसरात एकाची हत्या केली होती. सध्या तो पॅरोलवर बाहेर आला होता आणि याच काळात त्याने आपल्या पत्नीचाही काटा काढला.

पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपास चक्रांना वेग दिला आहे. मंगळवारी डॉक्टरांच्या विशेष पथकाने पोस्ट मार्टम प्रक्रिया पूर्ण केली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी अंजलीच्या नातेवाईकांना सुरक्षा पुरवली आहे. तपास अधिकारी एसआय जयपान सिंह यांनी सांगितले की, अंजलीचे मामा हिम्मत सिंह यांच्या तक्रारीवरून आरोपी संजय विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्या शोधासाठी ठिकठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहेत.

पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

अंजलीचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी बिरधाना गावात नेण्यात आले असून, संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. पॅरोलवर बाहेर आलेल्या गुन्हेगाराने पुन्हा अशा प्रकारचे कृत्य केल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करून कडक शिक्षा देण्यात येईल, असे आश्वासन पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहे. या घटनेमुळे पॅरोलवर बाहेर येणाऱ्या गुन्हेगारांच्या दहशतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close