पारडी पोलीसांची कामगिरी :- घरफोडी करणारे ०२ आरोपींना अटक, ०५ गुन्हे उघडकीस एकुण ४,७५,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त.
0
नागपुर प्रतिनिधी अमित वानखडे
दिनांक १३ फेब्रुवारी .२३ चे ०२.०० वा. ते दि. १४ फेब्रुवारी २३ चे १२.३० वा. चे दरम्यान पोलीस ठाणे पारडी हद्दीत, प्लॉट न. १९२, मारोती सोसायटी, जय अंबेनगर, नागपुर येथे राहणारे फिर्यादी देवीप्रसाद गोबऱ्यासाव जामुनपानी, वय ४५ वर्ष, हे त्यांचे घराला लॉक लावुन परिवारासह बालाघाट येथे गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घराचे दाराचे कडी कोंडा व कुलूप तोडुन घरात प्रवेश करून किचन मधील लोखंडी आलमारीतील सोन्या-चांदीचे दागिने व नगदी २०,००० /- रू असा एकुण ९७,७५०/- रू चा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे पारडी येथे अज्ञात आरोपी विरूध्द कलम ४५४, ४५७, ३८० भादवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे तपासात पो. ठाणे पारडी चे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून तसेच, तांत्रीक तपास करून, सापळा रचुन आरोपी क. १) अफरोज समशाद अन्सारी, वय २० वर्षे, रा. जयअंबे नगर, भांडेवाडी, पारडी, नागपुर, २) मो. फयाज एजाज अन्सारी, वय २० वर्षे, रा. गंगाबाग, तलमले वाडी, पारडी, नागपुर यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, आरोपींनी वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींना नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आली. आरोपींची सखोल विचारपुस केली असता, आरोपींनी पो. ठाणे पारडी हद्दीत १) प्लॉट नं. १०८, धनलक्ष्मी सोसायटी, विनोबा भावे नगर, पारडी येथे राहणारे फिर्यादी चमनलाल सुफाजी राहांगडाले, वय ४४ वर्षे, २) प्लॉट नं. ६६, राणी सती सोसायटी, अंबेनगर, पारडी येथे राहणारे नरेश गौरीशंकर चिणोरे, वय ३० वर्षे ३) प्लॉट नं. ५९, नागेश्वर नगर, पारडी येथे राहणारे फिर्यादी मो. मोईनोद्दीन अन्सारी, वय ५६ वर्षे, ४) प्लॉट नं. ९० भवानीमाता नगर, पारडी येथे राहणारे भागचंद मोतीलाल शर्मा, वय ५९ वर्षे असे एकुण ०४ ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली.
आरोपीचे ताब्यातुन एकुण ०५ गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले असुन गुन्हयातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी एकुण १२० ग्रॅम सोन्याचे दागिणे हस्तगत करण्यात आलेले आहे. आरोपींचे ताब्यातुन एकुण ४,७५,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरील कामगिरी मा. पोलीस उपआयुक्त परी क. ०५, सपोआ कामठी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि. श्री. मनोहर कोटनाके, पोनि गुन्हे भारत शिंदे, पोउपनि दिपक इंगळे, पोहवा. नितीन बोबडे, नापोअं. संदीप लांडे, शैलेष कुंभलकर, भुषण झरकर, योगेश बोरेकर, निखील मोहीते, आशिष रामटेके, व धनराज उमरेडकर यांनी केली.