अपघात

ट्रक चालकाचा निष्काळजी पणा भोवला ! अपघातात एक जागीच ठार तर एक गंभीर जखमी

Spread the love

 

अड्याळ : भंडारा पवनी महामार्गावरील अड्याळ नेरला च्या मधोमध येत असणाऱ्या अशोक मोहरकर महाविद्यालयाजवळ गुरुवारी रात्री साडे नऊ, दहा च्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकी वाहन चालक समीर रामू सेलोटे वय २१ वर्ष रा नवरगाव तालुका जिल्हा भंडारा याचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असणारा आकाश नाशिक गणवीर २१वर्ष नवरगाव तालुका जिल्हा भंडारा हा गंभीर रित्या जखमी असल्याने रात्रीच भंडारा येथे उपचार करिता ग्रामीण रुग्णालय अड्याळ येथुन रेफर करण्यात आले आहे. समीर आणि आकाश हे दोन्हीं एकाच गावचे रहिवासी असल्याने कडुली येथुन गावाकडे निघाले अड्याळ वरून जात असताना रस्त्याच्या मधोमध ट्रक चालकाने ट्रक उभा करुन ठेवलेला तर होताच परंतु ना इंडिकेटर ना एकही अशी वस्तू लावली होती की ज्यामुळे अपघात घडला नसता यामुळे गावात शोककळा पसरली असून हळ हळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार मृतक आणि गंभिर जखमी हे दोघेही आपाल्या दुचाकी वाहन क्र. MH 36 AJ – 8399 या वाहनाने अड्याळ वरुन आपल्या गावी जात असताना मोहरकर महाविद्यालय समोर ट्रक क्र MH 40 BL – 8167 चे चालकाने त्याचा ट्रक रोडाचे मधोमध नादुरूस्त होवून उभा असताना सदर ट्रकला ईतर वाहन धडकून अपघात होवू नये याकरीता त्या ट्रकचे कोणतेही पार्कीग लाईट किंवा ईटीकेटर सूरू ठेवले नाही तसेच ट्रक बंद असल्याबाबत कोणतेही लाल कपडा लावून सूचना फलक किंवा आवश्यक कोणतीही उपाय योजना न करता सार्वजनिक रस्त्यावर बराच वेळ धोकादायक रित्या रस्त्याचे मधोमध उभा करून ठेवल्यामूळे हा अपघात झाला व ट्यात निष्पाप जीवाचा बळी गेला
कायमी अप क्रं 264/2023 कलम 283,337,304 (अ) भा.द.वि. या नुसार ट्रक चालक विरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास ढोके तथा गोदमले हे करीत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close