जवानाने चक्क वाळूवर भाजले पापड
बिकानेर ( राजस्थान ) / नवप्रहार डेस्क
रखरखत्या उन्हात अंगाची लाहीलाही होत असल्याने लोकांनी घराबाहेर निघने कमी केले आहे. प्रशासनाकडून देखील आवश्यक काम असल्यासच घराबाहेर पडा अश्या सूचना देण्यात येत आहेत. असे असतांना सीमेवर असलेल्या जवानांना मात्र या रखरखत्या उन्हात देखील आपले कर्तव्य पार पडावे लागत आहे. ऊन, पाऊस,थंडी काहीही असो सीमेवरील जवान नेहमीच आपले कर्तव्य बजावण्यात कुठलीही कसर करत नाही. म्हणूनच तर म्हटल्या जाते की सीमेवरील जवान आपली भूमिका चोख बजावत असल्यानेच आपण घरात शांततेत झोपू शकतो.
बिकानेर येथे कर्तव्यावर असलेल्या बीएसएफ जवानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात हा जवान वाळूवर पापड भाजताना दिसत आहे. वाळूवर पापड भाजल्यावर तो त्याला तोडून सुद्धा दाखवत आहे. हा व्हिडीओ उन्हाची तीव्रता जरी दाखवत असला तरी अश्याही बिकट आणि विपरीत परिस्थितीत जवान आपले कर्तव्य कसे आणि किती चोख बजावतात हे पाहायला मिळते. बीएसएफ जवानाने चक्क वाळूवर पापड भाजले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बिकानेरमध्ये ड्युटीवर असलेला एक बीएसएफ जवान तापत्या वाळूवर पापड भाजत आहे.यावरून लक्षात येते की, देशाचे रक्षण करताना आपले जवान उन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता आपली जबाबदारी पार पाडतात.
एकीकडे उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी लोक एसी आणि कुलरचा सहारा घेत आहेत, तर दुसरीकडे देशाच्या सीमेवर तैनात असलेले आपले जवान या कडाक्याच्या उन्हात रात्रंदिवस सतर्क आहेत, जेणेकरून नागरिक सुरक्षित राहू शकतील.
एका एक्सवरील युजरने याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. याबरोबर युजरने लिहिले की, बिकानेरमधील तापमान 47 डिग्रीच्या पुढे गेले आहे. आणि बीएसएफ जवानाने गरम वाळूत पापड भाजले. इतक्या उष्णतेतही जवान समीमेवर आपली सेवा बजावत आहेत.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील ठिकाण पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या बिकानेरच्या खाजुवालाचा असल्याचे सांगितले जात आहे. राजस्थानमधील सर्वात उष्ण शहर म्हणून बिकानेरला ओळखले जाते. अशा कडाक्याच्या उन्हातही सैनिक देशाच्या रक्षणासाठी वाळवंटात उभे आहेत.