विमानाच्या आकाशात घिरट्या नागरिक आणि प्रवाशांमध्ये दहशत

शिर्डी / विशेष प्रतिनिधी
दिल्लीहून शिर्डीच्या दिशेला निघालेल्या इंडिगोच्या विमानासोबत धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे प्रवाशांसोबतच स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. यादरम्यानच इंडिगोचे विमान येवला आणि वैजापूर परिसरात हवेतच होल्डवर ठेवण्यात आले. यासोबतच या विमानाची उंडी जमिनीपासून अत्यंत कमी असल्याने स्थानिक नागरिक घाबरले. त्यानंतर शिर्डीला न उतरवता थेट सूरतमध्ये या विमानाची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण बघायला मिळाले. शिर्डीत येणाऱ्या इंडिगो विमानाला सुरक्षित सुरत विमानतळावर उतरवण्यात आले. या विमानात यादरम्यान 140 ते 150 प्रवासी होते.
मिळालेली अधिक माहिती अशी की, इंडिगोचे IGO 619Y हे विमान दिल्लीहून शिर्डीकडे येत होते. मात्र, खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे शिर्डी विमानतळावर त्याचे लँडिंग शक्य झाले नाही. पायलटकडून अनेक प्रयत्न हे विमान लँड करण्याकरिता प्रयत्न करण्यात आले, पण कमी दृश्यमानतेमुळे पायलटला शेवटपर्यंत विमान लँड करता आले नाही.
येवला आणि वैजापूर परिसरात हवेतच विमान होल्डवर
रात्री 8 च्या दरम्यान विमानाचे शिर्डीमध्ये लँडिंग होते. यानंतर विमानाला येवला आणि वैजापूर परिसरात हवेतच होल्डवर ठेवण्यात आले. विमान खूप खाली उडत असल्यामुळे स्थानिक नागरिक घाबरले. बराच वेळ हवेत घिरट्या घातल्यानंतरही हवामानात सुधारणा न झाल्याने आणि इंधनाचा विचार करून पायलटने विमान सुरतकडे वळवण्याचा निर्णय घेतला.
विमान जमिनीपासून कमी उंचीवर असल्याने नागरिकांनी घेतला धसका
इंधन भरल्यानंतर रात्री उशिरा 11 वाजता विमान पुन्हा शिर्डीकडे रवाना झाले. दरम्यान, या प्रकारामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. विमान 180 प्रवासी क्षमतेचे असून त्यात 140 ते 150 प्रवासी होते अशी माहीती मिळत आहे. यासोबतच विमानातील सर्वच प्रवासी सुरक्षित आहेत. मात्र, या घडलेल्या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण बघायला मिळाले. विमान सतत हवेत कमी उंचीवर घिरट्या घालत असल्याचे दिसल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळाले.




