सामाजिक

पांदण रस्त्याचा आणि घरकुलाचा  प्रश्न लवकरात लवकर निकाली काढा – आ.वानखेडे

Spread the love
आर्वी / मलिक शेख
              आष्टी तालुक्यातील पांदण रस्त्याची कामे प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांना वहिवाटी साठी त्रास होत आहे. त्यामुळे पांदण रस्त्याच्या कामाला घेऊन आणि घरकुला संदर्भात  पंचायत समिती आष्टी येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना प्रलंबित कामकाजासाठी समन्वय साधून लवकरात लवकर निकाली काढण्याच्या स्पष्ट सूचना आ. सुमित वानखेडे यांनी केल्या. तसेच, विविध विकासकामांच्या गतीमान अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या उपाययोजनांवरही चर्चा केली.
 या बैठकीमुळे विकास कामांना गती मिळून स्थानिकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ होईल, असा विश्वास आहे आ.वानखेडे यांनी व्यक्त केला
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close