राज्य/देश

पेंट फॅक्टरीला आग ; ११ कामगारांचा जळून मृत्यू

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया 

          नवी दिल्ली येथुन एक दुर्दैवी घटना समोर येत आहे. दिल्लीतील अलीपूर येथील एका पेंट फॅक्टरीला मध्यरात्री भीषण आग लागली. या कारखान्याला लागलेल्या आगीत ११ कामगारांचा जळून मृत्यू झाला.तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या दाखल झाला असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

दिल्लीतील अलीपूर येथील एका पेंट फॅक्टरीला भीषण आग लागली आहे. या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी हजर आहेत. या अपघात ठार झालेल्यांची ओळख पटवणे देखील कठीण झाले आहे. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशामक दलाच्या २२ फायर बंबाच्या मदतीने आग विझवण्यात आली. आगीत मोठे नुकसान झले आहे.

दिल्लीतील अलीपूर भागात ही पेंट फॅक्टरी आहे. या फॅक्टरीला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. त्यांनी ही आग आटोक्यात आणली.

ही आग भीषण होती. ही आग काही किलोमीटर दूरवरुन दिसत होती. यावेळी धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर उठताना दिसले. कारखान्यात काम करत असताना आग लागली तेव्हा कामगारांना बाहेर येण्याची संधी मिळाली नाही. यामुळे ११ जणांचा जळून मृत्यू झाला

या आगीच्या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, आगीच्या ज्वाळा या हवेत उंचावर जात आहेत. आगीसोबतच धुराचे लोटही हवेत दिसत होते. ही आग एवढी भीषण होती की आजूबाजूच्या दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. संपूर्ण कारखाना जळून खाक झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close