शे.घाट नगरीत श्री संत गजानन महाराज सामुहिक पारायण

महाराजांच्या भक्तांचा उसळणार जनसागर.
वरूड/तूषार अकर्ते
शेंदुरजनाघाट येथे अधिकमास माह व श्रावण मासांरभा निमित्त श्री संत गजानन महाराज भक्त परिवार शेदुरजनाघाट यांच्या वतीने एकदिवसीय श्री गजानन महाराज विजय ग्रंथ सामुहिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.२० जुलै रोज गुरवारला शे.घाट येथील तिवसाघाट रोडवरील श्री केदारेश्वर देवस्थान येथे ह.भ.प.प्रमोद दुधे यांच्या मार्गदर्शनात सामुहिक श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथ पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. पारायण वाचक संत गजानन भक्त अर्चना गुरव रा. अमरावती यांच्या वाणीतुन सारं वाचन होणार आहे. दि २० जुलै ला सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत पारायण वाचनानंतर महारांजाची महाआरती व त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. ज्या गजानन भक्तांना पारायण वाचना मध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी विजय चौधरी, बाबाराव पापडकर,पदमा माळोदे, सविता सावरकर, करुणा आंडे, प्रांजली चौधरी, मोनिका भोंगाडे, माधुरी माहुरे, निलीमा कुबडे, कवीता टोंगसे, जीजा बोरकुटे, कीर्ती शिंगरवाडे तसेच श्री संत गजानन महाराज भक्त परिवार पंचपथ चौक येथे संपर्क करण्याचे आवाहन गजानन भक्त परिवार शेंदुरजनाघाट यांच्या वतीने करण्यात आले आहे.