शेती विषयक

अवकाळी पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील झालेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या..

Spread the love

.

माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांची मुख्यमंत्र्यकडे मागणी

भंडारा : अलीकडेच विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या व काढणीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनस्तरावर योग्य मोबदला मिळावा, यासाठी आज मुंबई मंत्रालयात सरकारसमोर महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात आला.

या बैठकीला भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्यासह भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे धान उत्पादनाचे मोठे नुकसान झाल्याचा मुद्दा माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासमोर मांडला.

श्री.फुके म्हणाले, धान उत्पादक शेतकऱ्यांची काढणी केलेली पिके व उभे पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. किडींचा प्रादुर्भाव झाल्याने पिकेही उद्ध्वस्त झाली आहेत. शासनाने शेतकऱ्यांबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून त्यांच्या नुकसानीची भरपाई देऊन त्यांना आर्थिक मदत करावी.

शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेत शासनाने संबंधित अधिकाऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करण्याचे निर्देश देऊन नुकसान झालेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिल्याबद्दल डॉ. श्री फुके यांनी शासनाच्या आभार व्यक्त केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close