पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस संपन्न
विद्यार्थ्यांनी आत्मसात केले ध्यानाचे रहस्य
अमरावती / प्रतिनिधी
पी. आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट अमरावती मधील आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस आर्ट ऑफ लिविंग च्या सहयोगाने साजरा केला. या कार्यक्रमाकरिता आर्ट ऑफ लिविंग चे श्री प्रमोद उर्फ नाना कुकडे, श्रीमती रेखाताई सोलव, भावनाताई ढोरे व प्रथम वर्ष विभागाचे विभागप्रमुख डॉ. एन. आर. ठाकरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. श्री प्रमोद उर्फ नाना कुकडे यांनी ध्यानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले यात ध्यानाच्या नियमित सरावाने ताण-तणाव कमी होण्यास मदत होते, तसेच एकाग्रतेचा स्तर वाढतो तसेच ध्यानाने विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि त्यांना मानसिक शांती मिळेल असे प्रतिपादन केले. श्रीमती भावनाताई ढोरे व रेखाताई सोलव यांनी सूक्ष्म व्यायाम घेऊन विद्यार्थ्यांना ध्यानधारणा करण्यास सांगितले तसेच विद्यार्थ्यांना विविध ध्यानाच्या पद्धतींचे प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी भावना गगवानी ने केले.
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होत असतानाच मानसिक स्वास्थही विकसित व्हावे त्याच हेतूने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. प्राचार्य पी. एम. जावंधिया व उपप्राचार्य डॉ. मो. झुहेर यांच्या मार्गदर्शनामध्ये योग व आध्यात्मिक समिती समन्वयक डॉ. गौरी देशपांडे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले.
योग व आध्यात्मिक आयोजन समिती सदस्य मुक्ताई घोरमाडे, वंशिका कारोलकर, वृंदा मेहेरे, ईश्वरी खोडकर, सुहाने श्रीवास्तव, भूमिका कृष्णानी, वैदही मोहन, जया, अमृता, ऋतुजा, सायली, खुशी यांनी कार्यक्रमाची जबाबदारी सांभाळली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कुमारी श्वेता काळे हिने केले व कार्यक्रम अतिशय उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला.