हटके

OYO हॉटेल वर  गेलेल्या दोन कपल्स चा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल 

Spread the love

मुंबई  / नवप्रहार डेस्क                  .

                                 समाज माध्यमांवर दिवसाकाठी अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओत कितपत सत्यता असते हे व्हिडीओ पाहणाऱ्यालाच ठरवावे लागते. कारण आता व्ह्युज मिळविण्यासाठी देखील अनेक व्हिडीओ बनवले जातात. आम्ही आता ज्या व्हिडीओ बद्दल तुम्हाला सांगायचे आहे तो व्हिडीओ एका OYO हॉटेल मधला आहे.  लोक या व्हिडीओची इंटरनेटवर मजा घेत आहेत.

व्हायरल सामग्री तयार करण्यासाठी लोक मजेदार व्हिडिओ शेअर करतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन जोडपे हॉटेलच्या खोलीत जाताना दिसत आहेत. दोन्ही जोडपे आपल्या साथीदारांसह हॉटेलमध्ये पोहोचले होते. मात्र या जोडप्याने एकमेकांच्या बायकोला पाहिल्यानंतर दोघांमध्ये भांडण सुरू झाले. या विचित्र प्रेमकथेच्या क्लायमॅक्सने सर्वांनाच चकित केलं आहे.

व्हिडीओत काय दिसलं? व्हिडिओमध्ये दोन जोडपे एकामागून एक हॉटेलच्या खोलीत शिरताना दिसत आहेत. दोघांना एकमेकांच्या शेजारी खोल्या मिळाल्या. प्रथम आलेल्या जोडप्याने त्यांच्या खोलीबाहेर चप्पल काढली होती. दुसरं जोडपं त्यांच्या खोलीत पोहोचल्यावर त्या पुरुषाची नजर बाजूच्या खोलीबाहेर असलेल्या चपललींवर पडली.

त्याला या चपला ओळखीच्या वाटत होत्या. संशय आला म्हणून त्याने दरवाजा ठोठावला असता दुसऱ्या खोलीतूनही एक व्यक्ती बाहेर आला. समोरच्या व्यक्तीसोबत असलेल्या महिलेला पाहून त्याला धक्काच बसला. वास्तविक, ते दोघेही एकमेकांच्या बायकोला घेऊन हॉटेलवर आले होते.

जेव्हा दुसरं आलेल्या पुरुषाने पहिल्या कपलचा दार ठोठावला तेव्हा तिथून पहिला पुरुष बाहेर आला. त्याच्यासोबत जी महिला होती ती या पहिल्या आलेल्या पुरुषाची बायको होती. त्यामुळे या पुरुषाने दुसऱ्याची कॉलर पकडली. त्यांच्यात बाचाबाची सुरु होती, तोच पहिलं आलेल्या कपलच्या रुममधून एक महिला बाहेर आली जी त्या दुसऱ्या पुरुषाची बायको होती. यानंतर दुसऱ्या पुरुषाने पहिल्या पुरुषाचा गळ पकडला आणि त्याला मारायला सुरुवात केली. हा व्हिडीओ इथेच संपतो.
 

या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. मात्र, आम्ही तुम्हाला सांगतो की हा व्हिडीओ स्क्रिप्टेड असावा. लोकांचे मनोरंजन करण्यासाठी कलाकारांनी हा व्हिडीओ बनवला असावा.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close