अपघात
पतंग उडवताना स्लॅब वरून पडल्याने मुलगा जखमी
मोर्शी / ओंकार काळे
काल रविवारी शाळेला सुट्टी असल्यामुळे रामजीबाबा नगर स्थित.यश सुधाकर शिंगरवाडे इयत्ता आठवी हा पतंग उडवण्यासाठी घरच्या स्लॅब वर गेला.पतंग उडवतानी त्याला त्याचा तोल सांबळता आला नाही व तोल सुटला. आणि तो 15फूट उंची वरून खाली क्रॅन्क्रिटिकरनावर पडून जखमी झाला .सर्व घरी असल्यामुळे त्याला लागलीच रुग्णालयात नेण्यात आले.सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.परंतु शरीराला थोडी जास्त दुखापत होऊन हात फ्रॅक्चर होऊन अंदरुनी दुखापत झाली आहे.अशा प्रकरच्या घटनाभविष्यात घडू नये म्हणून सर्व पालकांनी आपल्या मुलांवर पतंग उडवतानी प्रामुख्याने लक्ष द्यावे असे मोर्शी चे सामाजिक कार्यकर्ते ओंकाराव जोल्हे यांनी आवाहन केले आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1