ओसाईवे फाऊंडेशन चे मेळघाटातील दंत्त चिकित्सा शिबीर उत्साह पुर्ण वातावरणात संपन्न
युवा नेते मा. श्री. रोहित पटेल यांनी केले उद्घाटन
धारणी, अमरावती
अंगणवाडी दत्तक कार्यक्रमा अंतर्गत ओसाईवे फाऊंडेशन नी धुळघाट रेल्वे येथील अंगणवाडी दत्तक घेतली आहे व मूलभूत सुविधांची कमी व अतिदुर्गम भाग असलेल्या धुळघाट रेल्वे येथे दंत्त चिकित्सा शिबीराचे आयोजन ओसाईवे फाऊंडेशनकडून करण्यात आले. ज्या मध्ये गर्भवती माता यांना गर्भधारणेच्या वेळी मौखिक स्वच्छता व दंत्त उपचार या बद्दल माहिती दंत्तरोगतज्ञ डॉ. स्नेहा शिवचरण केंद्रे यांनी दिली. तसेच १-५ वर्ष असलेल्या लाभार्थ्यांची दंत्त चिकित्सा केली व निरोगी दात ठेवण्यासाठी योग्य रितीने दातांची काळजी कशी घ्यावी या बाबतीत माहिती डाॅ स्नेहा केंद्रे यांनी दिली लाभार्थ्यांना मोफत दात घासण्याचे ब्रश व पेस्ट देण्यात आली. ओसाईवे फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ शिवचरण केंद्रे यांनी आदिवासी समाजासाठी १० खाटाचे रूग्णालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करती असल्याचे सांगितले असता श्री. रोहीत पटेल यांनी ओसाईवे फाऊंडेशन ला शासन व प्रशासन यांच्याकडुन जी काही मदत आवश्यक असेल ती करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून युवानेते श्री. रोहीत पटेल, संचालक बाजार समिती, धारणी, गट-विकास अधिकारी श्री. महेश पाटील, युवा स्वाभिमान पार्टी चे महाराष्ट्र प्रदेश संघटक प्रमुख श्री. शिवाजी केंद्रे, सीडीपीओ श्री. चव्हाण, बाजार समिती धारणी उपाध्यक्ष श्री.चंद्रशेखर सपाटे, सरपंच धुळघाट रेल्वे सौ. जिजाबाई कासदेकर, सुमीत घुमरे, महादेव घुमरे, रायबोले साहेब अंगणवाडी सेविका सौ. रायबोले मॅडम व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. श्री. गजु गित्ते यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केलेकेले व शिवाजी केंद्रे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आभार व्यक्त केले. या शिबिरात एकुन ६० लाभार्थींची तपासणी करण्यात आली.