परिसरातील विद्यार्थ्यांसाठी युवा शक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
इयत्ता दहावी व बारावी नंतर काय करावे हा प्रश्न बहुतांश विद्यार्थ्यांना भंडावून सोडणारा असतो. यातूनच विद्यार्थांना योग्य मार्गदर्शन मिळण्या हेतु आमदार प्रतापदादा अडसड यांच्या नेतृत्वात धामणगाव रेल्वे येथे होणार युवा शक्ती करिअर मार्गदर्शन शिबिर.
*छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराद्वारे विद्यार्थी युवक युवतीसह पालकांचेही करिअर विषयक विविध संधी संदर्भात समुपदेशन केले जाणार आहे. युवांना उचित मार्गदर्शन करण्याच्या स्तुत्य उपक्रमात सहभागी व्हा.- आमदार प्रतापदादा अडसड.*
*”छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर” राचे आयोजन सोमवार उद्या दिनांक ८ मे २०२३ वेळ सकाळी १०.०० वाजता स्थळ आरोही रिसॉर्ट लुनावत नगर धामणगाव रेल्वे येथे आयोजित केले आहे. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून धामणगाव रेल्वे मतदार संघाचे आमदार श्री.प्रतापदादा अडसड तर अध्यक्ष स्थानी आयटीआयच्या आयएमसीचे सदस्य श्री.अजयसिंगजी ठाकुर, प्रमुख उपस्थिती तहसीलदार वसिमा शेख तर मार्गदर्शक वक्ते श्री.संजयजी बोराडे, श्री.प्रविणजी खांडवे, श्री.गजानन कोरे, श्री.अभिनव मोहोड आदी तज्ञ मार्गदर्शन करणार आहे.तरी सर्व विद्यार्थी व पालकांनी अवश्य लाभ घ्यावा ही विनंती*