सामाजिक

बुद्ध पौर्णिमेनिमित्त दोन दिवशीय बौद्ध महोत्सवाच्या आयोजन

Spread the love

 

ख्यातनाम गायिका मंजुषा शिंदे यांच्या संगीतमय कार्यक्रमाने जिंकले सर्व आर्वीकरांची मने.

मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाकरिता गर्दी.

जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुजित भिवगडे व महासचिव सुरेश भिवगडे यांच्या सूत्रबद्ध नियोजनाने कार्यक्रम यशस्वी झाल्याची सर्वत्र चर्चा.

आर्वी / प्रतिनिधी
विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 133 वी जयंती उत्सव समिती आर्वी द्वारे त्रिविध वैशाख बुद्ध पौर्णिमा निमित्त दोन दिवशीय बौद्ध महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक 23 मे 2024 बुद्ध पौर्णिमेला सकाळी जयंती समितीचे अध्यक्ष सुजित भिवगडे यांचे हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले तर समितीचे सचिव धम्म प्रचारक सुरेश भिवगडे यांचे असते बुद्ध वंदना पार पडली याप्रसंगी समिती सदस्यांची उपस्थिती होती.
संध्याकाळी सहा वाजता भव्य धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या धम्म रॅलीत आर्वी शहरातील बुद्ध विहार, महिला मंडळ उपासक-उपासिका यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून हाती
मेणबत्ती घेऊन विश्वशांतीचा संदेश देणारी हि धम्म रॅली आर्वीकरांसाठी चर्चेचा विषय ठरली. प्रबुद्ध बुद्ध विहार गौरक्षण वार्ड आर्वी येथून धम्म रॅलीला सुरुवात झाली.
शहराच्या प्रमुख मार्गाने फिरून समारोपीय कार्यक्रम बुद्ध विहार डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर आर्वी येथे संपन्न झाला .
पंचशील युवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने धम्मरॅलीत सहभागी उपासक उपासिका यांच्यासाठी अल्पोपहार व खीरदान वितरित करण्यात आला.
यावेळी पाली भाषा परीक्षा प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महाकारूनिक भगवान बुद्ध यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी धम्म प्रचारक सुरेश भिवगडे यांचे त्रिविध वैशाख पौर्णिमेचे महत्त्व या विषयावर प्रवचन झाले.
या कार्यक्रमाला जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुजित भिवगडे व इतर समिती सदस्य उपस्थित होते.
दिनांक 24 मे 2024 ला विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 133 वी जयंती उत्सव समिती आर्वी द्वारा बुद्ध जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त जयंती दिनानिमित्ताने गांधी चौक आर्वी येथे संध्याकाळी सहा वाजता महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका मंजुषा शिंदे यांचा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका मंजुषा शिंदे यांनी सर्व आर्वीकरांची मने आपल्या गीतातून जिंकून घेतले.
लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात बाबासाहेबांमुळे हे सुप्रसिध्द गीत
तसेच तिच्या हिंमतीने घडलाय इतिहास नवा बहुजनांच्या घरी तेव्हा लागलाय दिवा आई रमाबाई यांच्या जीवनावर आधारित गीतांनी लोकांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामीण शहरी भागातील लोकांची उपस्थिती होती.
प्रचंड गर्दीने या कार्यक्रमाला यशस्विता प्राप्त करून दिली.
सुप्रसिद्ध गायिका मंजुषा शिंदे यांना सन्मानपत्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन जयंती समितीचे अध्यक्ष सुजित भिवगडे
व जयंती समितीचे महासचिव सुरेश भिवगडे कोषाध्यक्ष पंकज भीमके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने सुद्धा मंजुषा ताई यांचा सत्कार करण्यात आला या सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांनी भारतीय संविधानाची प्रत भेट दिली तर प्रज्ञा शील करुणा या ग्रुपने त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला
यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाबारावजी सोमकुवर व समितीचे सहसचिव प्रमोद चौरपगार व माझी रमा माझी रमा या गीतात अभिनय करणारी आर्वी शहरातील दीक्षा प्रमोद डोळस यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
या संगीतमय कार्यक्रमाचे उद्घाटन ओमप्रकाश पाटील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.पंकज वाघमारे
प्रमुख अतिथी बाळाभाऊ जगताप प्रवीण तंबाखे समाज सेविका शुभांगी भिवगडे सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक बाबारावजी सोमकुवर तर प्रमुख उपस्थिती प्रकाश बनसोड प्रा डॉ प्रवीण काळे सिद्धार्थ मुंद्रे प्रमोद भिवगडे कपिल लांडगे दिनेश सवाई प्रा. राजेश सवाई प्रा. डॉ. अनिल भगत
देवानंद डोळस इत्यादी जण होते.
या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन आकांक्षा नळे यांनी केले
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
समितीचे अध्यक्ष सुजित भिवगडे समितीचे महासचिव सुरेश भिवगडे
कोषाध्यक्ष पंकज भीमके
प्रशांत मात्रे गौतम कुंभारे
अमोल दहाट गौतम मेश्राम
प्रवीण काळे प्रमोद चौरपगार रहूपाल नाखले
संघटक रवी गाडगे, अनिकेत बांबुळकर, संदीप दहाट आकाश सवाई
सल्लागार सुखदेवराव नंदागवळी
प्रा. पंकज वाघमारे
ओमप्रकाश पाटील प्रकाश बनसोड दीपक ढोणे प्रशांत सूर्यवंशी अरुण पानेकर. ई सहकार्य केले

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close