श्री ज्ञानेश्वर संस्थान पुसद द्वारा देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे चे आयोजन
शालेय विद्यार्थ्यांमध्ये देश प्रेमाची ज्योत राहण्यासाठी उपक्रम
राजेश सोनुने पुसद तालुका प्रतिनिधी
श्री ज्ञानेश्वर संस्थान पुसद द्वारा यावर्षी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांची देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा
मंगळवार दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 1.00ते 5.00 विनामूल्य आयोजित केली आहे.
या स्पर्धेसाठी दोन गट करण्यात आले आहेत.
अ गट इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी मधील विद्यार्थी.
ब गट इयत्ता आठवी ते इयत्ता दहावी मधील विद्यार्थी.
पारितोषिक प्रत्येक गटासाठी खालील प्रमाणे देण्यात येणार आहेत.
प्रथम पारितोषिक पंधराशे रुपये रोख गौरव चिन्ह आणि प्रमाणपत्र
द्वितीय पारितोषिक 1000 रुपये रोख गौरव चिन्ह आणि प्रमाणपत्र.
तृतीय पारितोषिक सातशे रुपये रोख गौरव चिन्ह आणि प्रमाणपत्र
सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास संस्थांच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात येईल.
पारितोषिक सौजन्य मेहेर सिटी पुसद व मोतेवार सारीज पुसद यांच्या वतीने.
देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा मंगळवार दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी वेळ दुपारी एक ते पाच पर्यंत स्थळ कैलासवासी बापूराव चिदर्वार स्मृती सभागृह श्री ज्ञानेश्वर संस्थान पुसद.
या कार्यक्रमास आपण सादर आमंत्रित आहात.
विद्यार्थ्यांच्या या गीत गायन स्पर्धेनंतर सायंकाळी पाच वाजता शहरातील जेष्ठ संगीत साधकांकडून देशभक्ती गीतांचा कार्यक्रम संपन्न.
त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न होईल तरी जनतेने या देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेच्या मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे गीत गायन ऐकण्यासाठी दुपारी एक ते सहा वाजेपर्यंत यावे व याचा आपण लाभ घ्यावा ही विनंती.