आध्यात्मिक

श्री क्षेत्र उत्तरवाहिनी बेलगाव (धानोली) येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ उत्सवाचे आयोजन 

Spread the love
  श्री संत ब्रह्ममूर्ती सद्गुरु लुंगे बाबा पुण्यतिथी सोहळा व श्री जोग महाराज पुण्यस्मरणोत्सवानिमित्त श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ 
सेलू / राजेश वरटकर
नजीकच्या पुरातन श्री क्षेत्र उत्तर वाहिनी बेलगाव (धानोली) येथील स्वयंभू सिद्धेश्वर मंदिरात योगलीन समाधीस्थ परमपूज्य गुरुवर्य श्री संत ब्रह्ममूर्ती सद्गुरू लुंगे बाबा पुण्यतिथी सोहळा व स्वानंद सुखनिवासी श्री जोग महाराज पुण्यस्मरनोत्सवा निमित्त श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ गुरुवार दिनांक २ ते गुरुवार दिनांक ९ एप्रिल पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. कथा प्रवक्ते गुरुवर्य पुंडलिक महाराज बोळवटकर (संस्थापक अध्यक्ष श्री ज्ञानराज माऊली कृपा प्रासादिक संस्था पंढरपूर) हे असून उत्सवाचे हे २४ वे वर्ष आहे.
        कलश स्थापना  गुरुवार दि.२ ला पहाटे ब्रह्म मुहूर्तावर ह. भ. प. यशवंत महाराज भोगे, श्री क्षेत्र सालबर्डी व बालयोगी चंदू महाराज जोगनगर झुणका यांचे हस्ते होईल. दररोज पहाटे काकडा भजन, सकाळी ७ वाजता ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामूहिक पारायण, सकाळी ९ ते ११ व दुपारी ३ ते ५  श्रीमद् भागवत कथा , दुपारी १२ वा. भजनसेवा, ५ वाजता हरिपाठ, रात्री ६.३० ते ८.३० प्रसिद्ध कीर्तनकाराची दररोज किर्तने होईल. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे व्यासपीठाचार्य ह .भ .प .गुरुवर्य वाल्मीक दादा भोयर महाराज केळापूर व ह.भ.प.गु .शंकर महाराज टापरे शास्त्री वंधली हे राहतील.
 सप्ताह काळात दररोज दिनांक  २ ते ९ पर्यंत संध्याकाळी ह भ प भारत महाराज सारई, झुणका,  ह. भ. प. लक्ष्मण महाराज तराड , ह
भ.प. चंद्रकांत महाराज डहाके,ह. भ प. रुपदेव महाराज धोटे , ह. भ. प.गु. शांताराम महाराज जामुनकर, ह. भ. प. गु. लक्ष्मणराव महाराज गुडवार यांची कीर्तने होईल तर दिनांक  ९ एप्रिलला सकाळी ११ वाजता ह. भ. प.गु. पुंडलिक महाराज बोळवटकर यांचे काल्याचे किर्तन व त्यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
(बॉक्स ) ८ एप्रिलला दिंडी सोहळा…
बुधवार दि. ८ एप्रिल ला दुपारी ४ वाजता धानोली व बेलगाव गावातून पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
   सप्ताहाचे विणेकरी म्हणून ह . भ.प.पांडुरंग महाराज जगधरे हे राहतील, श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व किर्तन सेवेला ह भ प सर्वश्री दिलीप महाराज मडावी, चंद्रकांत महाराज डहाके, नितीन महाराज निधेकर, अविनाश महाराज भोयर, अजय महाराज डेहणे, मंथन महाराज कोरडे, किशोर महाराज ठाकरे, भरत महाराज सारई, उमेश महाराज कोल्हे, नारायण महाराज इंगळे, विठ्ठल महाराज चौधरी, गोलू महाराज शास्त्रकार हे गायक व भजनी मंडळी साथ संगत करतील. (बॉक्स).. महाप्रसादाचे दिवशी ९ एप्रिलला वाहनाची  निशुल्क व्यवस्था..
महाप्रसादाचे दिवशी  गुरुवार दिनांक ९ ला सेलूच्या शासकीय विश्रामगृहापासून कार्यक्रम स्थळापर्यंत जाण्या येण्यासाठी निशुल्क वाहनाची व्यवस्था भाविकांच्या वतीने करण्यात आली आहे. या संपूर्ण धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती बेलगाव, धानोली , सेलू , कोटंबा, कोलगाव ,इटाळा ,महाबळा व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close