एस ओ एस कब्स व प्राथमिक मध्ये “वाचन प्रेरणा दिवस” चे आयोजन
शास्त्रज्ञ भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम
धामणगाव रेल्वे
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या वाढदिवसानिमित्त श्री दत्ता जी मेघे बाल कल्याण शैक्षणिक संस्था संचालित स्थानिक एस ओ एस कब्स व प्राथमिक शाळेत “वाचन प्रेरणा दिन” या भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने आज एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका के साई नीरजा यांच्या वतीने डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी इयत्ता चौथी आणि सहावीचे विद्यार्थी एपीजे अब्दुल कलाम यांची वेशभूषा करून आले होते. त्यांनी त्यांच्या जीवनावर आधारित महत्त्वाची माहिती दिली. यावेळी इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित प्रश्न मंजुषा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुलांना हाऊस नुसार प्रश्न विचारण्यात आले. ज्यांनी सर्वाधिक प्रश्नांची उत्तरे दिली त्यांना विजेते घोषित करून गौरविण्यात आले. यावेळी पर्यवेक्षिका शबाना खान यांनी विद्यार्थ्यांना एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनाविषयी माहिती दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका के.साई नीरजा, पर्यवेक्षिका शबाना खान, ग्रंथपाल प्रवीण टोंगे, येलो हाऊसचे सदस्य व आयोजन समितीचे सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व वर्ग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.