सामाजिक

जगतगुरु प्रबोधन मंडळ तेल्हारा तर्फे जीवनसाथी पुस्तिका प्रकाशनाचे आयोजन*ल

Spread the love

तेल्हारा

बाळासाहेब नेरकर कडून

विदर्भातील सकल कुणबी समाजाचे एकमेव संघटन असलेल्या जगतगुरु प्रबोधन मंडळ तेल्हारा तर्फे यावर्षी प्रथमच सकल कुणबी समाजातील उपवर युवक युवतीची माहिती असलेल्या जीवनसाथी या पुस्तिकेच्या प्रकाशनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कुणबी समाजातील पोटजातीतील भेद संपुष्टात यावा व पोटजातींमध्ये विवाह संबंध जुळावेत या उद्देशाने जगतगुरु प्रबोधन मंडळाने मागील वर्षी सकल कुणबी समाजातील उपवर युवक युवतीचा परिचय मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्याला समाज बांधवाचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघता यावर्षी मंडळाने युवक युवती परिचय मेळाव्या सोबतच जीवनसाथी पुस्तिका प्रकाशित करण्याचे ठरवले आहे. या पुस्तिकेत उपवर युवक युवतीचे नाव नोंदवन्यासाठी नाममात्र दोनशे पन्नास रुपये फी ठरवीण्यात आली असून नाव नोंदवणाऱ्या उपवर युवक युवतीला जीवनसाथी पुस्तिका देण्यात येईल. नाव नोंदवण्याची अंतिम तारीख पाच नोव्हेंबर ठरवण्यात आलेली आहे. जगतगुरु प्रबोधन मंडळाच्या प्रोत्साहनाने यावर्षी सकल कुणबी समाजात दोन विवाह घडून आले. तरी पोटजातीतील दरी मिटवण्यासाठी सकल कुणबी समाज बांधवानी जीवनसाथी पुस्तिकेसाठी बायोडाटे व जाहिराती द्याव्यात असे आवाहन जगतगुरू प्रबोधन मंडळ व कुणबी समाज तेल्हारा तालुका व शहराच्या वतीने गणेश तिव्हाने, स्वप्निल भारसाकळे, गजानन गायकवाड, अनिल मानकर, दिपक वाघमारे, सुनिल बुरडे, केशव शेंगोकार, ज्ञानेश्वर बहाकर, विठ्ठल मामनकार, यांनी केले असल्याचे मंडळाचे सचिव राजेश बुरघाटे व सल्लागार प्रा. उज्ज्वल दबडघाव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close