आषाढी एकादशीनिमित्त दिंडी व वृक्षारोपण अभियानाचे आयोजन
बिलोली (प्रतिनिधि):
सरस्वती प्राथमिक शाळा, बुरुड गल्ली, बिलोली येथे पर्यावरण जनजागृती व्हावी या उद्देशाने वृक्षदिंडी अभियानाचे आयोजन करण्यात आले.
शाळेतील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी वारकरी वेष परिधान करून व एका वृक्षाचे रोपटे हाती घेऊन “आम्ही पर्यावरणाचे वारकरी, झाडे लावू घरो घरी” या जयघोषात संदेश दिला आहे आणि प्रभात काळी शहरातील प्रमुख रस्त्याने आणि गल्ली बोळातून वृक्षदिंडी काढण्यात आली.
याप्रसंगी सरस्वती प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक श्री. एल.आय. खेमशेट्टी, सहशिक्षक श्री. शिलानंद गायकवाड सर, श्री.बी.आय. बोडके सर, श्री. डी.एल. बोगरे सर, सौ. धानोरकर मॅडम, सौ. मठवाले मॅडम, श्री. डाकोरे सर या जनजागृती प्रभात भेरीत दिशादर्शन करण्यास सक्षम होते.
ही प्रभात फेरी पूर्ण बिलोली शहरातील प्रत्येक भागात केवळ वृक्ष लावण्यात यावे यासाठी होती. सरस्वती प्राथमिक शाळा, बुरुड गल्ली, बिलोली यांचा हा पहिला उपक्रम सर्व बिलोली वासियांच्या आश्चर्याचा विषय झाला आहे.
नव प्रहार बिलोली प्रतिनिधींनी या दिंडीत सहभागी होऊन सर्व शहरातील या वृक्ष दिंडीचे मूल्यांकन केले आहे.