23 वे राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाचे आयोजन
हिवरखेड (अमरावती) :- (जितेंद्र ना. फुटाणे) :- येथील सर्वोदय शिक्षण समिती हिवरखेड व वऱ्हाड विकास अमरावती यांचे संयुक्त विद्यमाने भारतीय समाज क्रांतीचे जनक व धर्मातील लोकशाहीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले यांचा 134 वा पुण्यतिथी समारोह तसेच 23 वे राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन आयोजन दि. 27 नोव्हेंबर रोज बुधवार ला महात्मा फुले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. या 23 व्या राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाची सुरुवात दि. 26 नोव्हेंबर 2024 रोज मंगळवार ला गावात महात्मा फुलेंच्या ग्रंथ- दिंडीने करण्यात येईल..
या 23 वे राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मा. डॉ. रजिया सुलताना (पुरोगामी लेखिका, अमरावती) यांची निवड करण्यात आली . तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक मा. भाग्यश्री ताई बानायत -डिवरे. (आय.ए.एस. सचिव , जनसंपर्क विभाग दिल्ली) तसेच स्वागताध्यक्ष मा. प्रा. प्रफुल भाऊ व भोजने (सामाजिक कार्यकर्ते) तसेच प्रमुख अतिथी मा. सौ. सविता ताई गो मालपे (सरपंच ग्रामपंचायत हिवरखेड) मा. श्री. रामरावजी वानखडे (माजी प्राचार्य, अध्यक्ष, उत्क्रांती पतसंस्था जरूड) मा. श्री. दिलीप भाऊ भोयर (शेतकरी नेते) मा. श्री. साहेबरावजी पाटील (अध्यक्ष ,सर्वोदय शिक्षण समिती हिवरखेड) मा. श्री. सचिन भाऊ तायवाडे (उपसरपंच ,ग्रामपंचायत हिवरखेड ) यांची उपस्थिती राहील.
या कार्यक्रमाला गावातील मंडळींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे.