शेती विषयक

दापोरी येथे महाधन अँग्रीटेक लिमिटेड कंपनी तर्फे संत्रा पिक पाहणी कार्यक्रम संपन्न………

Spread the love

 

हिवरखेड:- येथील शेतकरी श्री सतीश नवघरे यांचे मौजा दापोरी येथील शेतामध्ये खत क्षेत्रातील अग्रेसर कंपनी महाधन‌ अँग्रीटेक‌ लिमिटेड या खत कंपनी च्या वतीने दिनांक १८/१०/२०२४ रोज शुक्रवार ला मौजा दापोरी येथील शेतामध्ये क्रॉपटेक 9-24-24 व सोलुटेक या खताचा पिक पाहणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या वेळेस गावातील 100ते 150 शेतकरी बांधव उपस्थित होते श्री सतीश भाऊ नवघरे यांनी 2 एकर मध्ये 275 संत्रा झाडाची लागवड केली आहे तर यामधे त्यांना फळाची साइज् व फळाची चकाकी अधिक पानाची संख्या एक सारखी दिसून आली व शेवट पर्यंत झाड हिरवेगार राहिले तसेच पानाची साइज पण चांगली झाल्याचा अनुभव सतिश भाऊ नवघरे यांना आला आहे तसेच उत्पादना मधे एकरी तब्बल 2 ते 3 टन वाढ होण्याची शक्यता आहे या वेळेस त्यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना सुध्दा या खता बद्दल अनुभव व्यक्त केला या कार्यक्रमामधे कंपनीचे अमरावती जिल्हा मार्केटिंग मॅनेजर श्री अमोल शिंगणे साहेब व जिल्हा फील्ड सेल्स मॅनेजर श्री निरंजन येवले साहेब श्री पवन राऊत साहेब तसेच त्यांचे सहकारी प्रज्वल वडनेरकार, शुभम मनकवडे हे उपस्थित होते.
व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रज्वल वडनेरकार यांनी केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close