सन 2013 च्या दरोडा मधील फरार आरोपी यवतमाळ येथून मंगरूळ दस्तगीर पोलीस कडून अटक
मंगरूळ दस्तागिर / प्रतिनिधी
पो स्टे. मंगरूळ दस्तगीर हद्दीतील ग्राम पिंपलखुटा पाणीपुरवठा पंप हाउस येथे सन 2013 मधे रात्रीला अज्ञात 7 ते 8 आरोपीतानी तोंडाला दुपट्टे बांधून, चौकीदाराला कुऱ्हाडीचा धाक दाखवून, मारहाण करून फिर्यादीचे व साथीदाराचे दोराने हात-पाय बांधून तीन लाखाचा मुद्देमाल दरोडा टाकून नेला होता. फिर्यादी आत्माराम जयकिशन मेश्राम रा. धामणगाव रेल्वे यांचे तक्रारीवरून पोलीस स्टेशन मंगरूळ दस्तगीर येथे अपराध क्रमांक 98/2013 कलम 395, 412, दंड संहिता प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल होता. सदर दरोड्यातील फरार आरोपी किशोर ऊर्फ काल्या किसन वासनिक वय 34 वर्ष रा. यवतमाळ हा कोर्टात तारखेवर हजर होत नसल्याने तेव्हापासून गुन्हा कोर्टामध्ये प्रलंबित होता. आरोपीचा मंगरुळ दस्तगीर पोलीस कसोशीने शोध घेत होते आज दिनांक 13/06/2023 चे सकाळी 04.00 वाजता यवतमाळ येथील दमनकर व इंदिरा झोपडपट्टी येथे मंगरूळ दस्तगीर पोलीस व यवतमाळ पोलीस यांनी सापळा रचून आरोपीस मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीस आज रोजी मा. जिल्हा तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अमरावती यांचे समोर पेश करण्यात येत आहे. सदरची कार्यवाही ठाणेदार सुरज तेलगोटे यांचे मार्गदर्शनात आरोपी अटक पथक पोहवा मनोज राजपूत, पोशी निशांत शेंडे, संदीप पाटील यांनी केली आहे.