लाहोटी महाविद्यालया तर्फे प्लॅस्टिक निर्मूलन कार्यक्रम :
:रासेयो पथकाचे आयोजन
मोर्शी / ओंकार काळे
श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित श्री आर आर लाहोटी विज्ञान महाविद्यालय मोर्शी येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे स्वच्छता ही सेवा या अभियाना अंतर्गत प्लॅस्टिक निर्मूलन उपक्रम शहरातील विविध ठिकाणी राबविण्यात आला.
स्वच्छता ही सेवा या उपक्रमा अंतर्गत शहरात व महाविद्यालयात विविध कार्यक्रम राबविल्या जात आहे. याच उपक्रमा अंतर्गत महाविद्यालयात व परिसरात स्वच्छता रहावी यासाठी श्री आर आर लाहोटी विज्ञान महाविद्यालया च्या रासेयो पथकाच्या वतीने शहरातील पोलीस स्टेशन,तहसील कार्यालय परिसर व मुख्य रस्ता तसेच महाविद्यालयामध्ये स्वच्छता करून रस्त्यावर पडलेले प्लॅस्टिक निर्मूलन केले. नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून द्यावे यासाठी ठिकठिकाणी नागरिकांना प्लॅस्टिक निर्मूलनाचे महत्व पटवून दिले.
स्वच्छता ही सेवा हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम असून, हा उपक्रम भारत सरकारने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सुरू केलेला आहे. याचा मुख्य उद्देश देशभरात स्वच्छता वाढवणे आणि लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे. या मोहिमेचा भाग
म्हणून जनतेमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण केली जाते आणि स्वच्छतेच्या कार्यात अधिकाधिक लोकांचा सहभाग वाढवला जातो.
परिसरात प्लास्टिक निर्मूलन अभियान हे एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे, ज्याचा उद्देश सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरण संरक्षण करणे आणि स्वच्छता राखणे आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे होणारे नुकसान टाळणे आणि
त्याऐवजी पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर प्रोत्साहन देणे हा आहे.
दरम्यान रासेयो पथकाच्या विद्यार्थ्यांनी मुख्य रस्त्यावर साफसफाई करून नागरिकांमध्ये जनजागृती केली नागरीक आणि विक्रेत्यांना प्लास्टिकमुळे होणारे पर्यावरणीय नुकसान पटवून देण्यासाठी माहिती दिली.
मुख्य रस्त्यावर प्लास्टिक निर्मूलन अभियानाने केवळ पर्यावरण संरक्षणच नाही तर स्वच्छता सुधारण्यातही मोठे योगदान दिले आहे.त्याचबरोबर
तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन सभोवतालचा परिसर रासेयो स्वयंसेवकांनी श्रमदान करून प्लास्टिक निर्मूलन केले.
या स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. जी. एन. चौधरी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
या कार्यक्रमाला रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.अविनाश उल्हे, डॉ.अश्विन लुंगे,प्रा. नितीन कोळेकर, अंकित औतकर, सिध्दार्थ पाटील, कमलेश गोरले तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.