क्राइम
या कारणाने महिलेने तरुणाच्या प्रायव्हेट पार्ट वर चाकूने केले वार
सोलापूर / नवप्रहार मीडिया
ती त्याच्या मोबाईल शॉप मध्ये यायची. त्यामुळे त्यांच्यात ओळख वाढून त्याचे रूपांतर प्रेमात झाले. आणि जवळीक वाढल्याने त्यांच्यात शरीर संबंध प्रस्थापित झाले. विवाहित असलेल्या या महिलेने तरुणाला ब्लॅकमेल करून लग्न करण्यासाठी दबाब टाकला.तरुणाने नकार दिल्यावर त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यात त्याला अटक होऊन दोन महिने तुरुंगात जावे लागले.जमानतीवर बाहेर आल्यावर सुद्धा ती तरुणावर लग्नासाठी दबाब टाकत होती. त्यामुळे त्याने तिच्या सोबत आळंदीला जाऊन लग्न केले. घटनेच्या दिवशी तिने त्याला कॉल करून लॉजवर बोलावले आणि त्याला विवस्त्र करून त्याच्यावर शारीरिक संबंधासाठी दबाब टाकू लागली. त्याने नकार देताच तिने त्याच्या गुप्तांगावर चाकूने वार करून जखमी केले. तरुणाच्या तक्रारी वरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून महिलेला अटक केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कमलेश काकासाहेब सांगळे (वय २४ रा. शिरूर घाट ता. केज जि. बीड) याचे मोबाइलचे दुकान होते. या दुकानात महिला कामानिमित्त आल्यानंतर त्यांची ओळख झाली आणि त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. आधीपासून विवाहित असलेल्या महिलेने तरुणाकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र सांगळे याने नकार दिल्यानंतर ब्लॅकमेल केलं. महिलेने मार्च २०२३ मध्ये तरुणावर शिवाजी नगर पोलिस ठाणे येथे बलात्काराचा गुन्हा दाखल केला. बलात्कार प्रकरणी त्याला अटकही झाली. दोन महिन्यांनी जेलमधून बाहेर आल्यानंतरही ती त्रास देत होती. शेवटी तरुणाने ऑगस्ट २०२३ मध्ये तिच्यासोबत आळंदीत विवाह केला.
लग्नानंतरही महिला तरुणासोबत राहत नव्हती. मात्र ती त्याला फोन करून आणि दुकानात जाऊन त्रास देत होती. तिच्या त्रासाला कंटाळून तरुण ३ महिन्यांपूर्वी बार्शी तालुक्यात नातेवाइकाकडे राहण्यास गेला. पण त्यानंतर गुरुवारी २१ मार्च रोजी पहाटे ५ वाजता तिने समाज माध्यमावरील कमलेशच्या अकाउंटवरून फोन केला. त्याला धमकी देत गुरुवारी दुपारी बार्शी एस.टी. स्टॅन्डवर भेटण्यासाठी बोलावले. तेथून ते दोघेही तेथीलच एका लॉजवर गेले. लॉजवर तिने शरीर संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तरुणाने नकार दिला. तरीही कमलेशचे कपडे काढत त्याच्या गुप्तांगावर चाकूने वार केले. या प्रकरणी महिलेला अटक केली असून तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.