हटके

या ठिकाणी शिक्षकांनी विद्यार्थिनींना केलं निर्वस्त्र 

Spread the love

इंदूर / नवप्रहार ब्यूरो

                एकीकडे शासन ‘ मुलगी वाचवा मुलगी शिकवा ‘ असा नारा देत असेल तरी प्रत्यक्षात मुली बाहेर तर सोडा शाळेत आणि स्वतःच्या घरी सुद्धा सुरक्षित नसल्याचे अनेक घटनांमधून समोर येते. इंदूर मधील एका  शाळेत तर भलताच प्रकार घडला आहे. या शाळेत मोबाईल तपासण्यासाठी विद्यार्थिनींना निर्वस्त्र करण्यात आल्याची चर्चा आहे. पालकांना याबद्दल समजताच संतप्त पालकांनी ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एका अधिकाऱ्याने सांगितले की, शाळेतील काही विद्यार्थिनींना विवस्त्र करून त्यांची झडती घेण्यात आली. जेणेकरून वर्गात मोबाईल कोणी आणला होता हे कळू शकेल. यानंतर विद्यार्थिनींचे कुटुंबीय संतप्त झाले.

विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांनी मल्हारगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. फिर्यादीनुसार बडा गणपती परिसरात असलेल्या शासकीय शारदा कन्या उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिकेने वर्गात मोबाईल वाजायला लागल्यानंतर मुलींना शौचालयात नेले आणि कपडे काढण्यास सांगितले. यानंतर या काळात विद्यार्थिनींनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. शाळेतील एका मुलीने सांगितले की, शिक्षकांनी तिला टॉयलेटमध्ये नेले आणि तिचे कपडे काढायला लावले.

आरोपींवर कारवाई केली जाईल

तक्रारीनुसार केवळ कपडे काढायला लावले नाही तर शिक्षकांनी मोबाईल आणल्याचे स्वीकार न केल्यास व्हिडिओ शूट करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला जाईल, असेही म्हटले. याप्रकरणी तक्रारीचा तपास सुरू असल्याचे सांगितले जाता आहे. त्यानंतर आरोपींवर कारवाई केली जाईल.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close