Uncategorized

या कारणाने भारतीय क्रू मेंबर्स ची अमेरिकेत होतेय स्तुती 

Spread the love
मुंबई  / नवप्रहार मीडिया 

 
                 अनेक वेळा भारतीयांनी असाधारण काम।करत आणि आपल्या कार्याचे कौशल्य दाखवत विदेशात देशाचा डंका वाजवला आहे. बाल्टिमोर येथे घडलेल्या मालवाहू जहाजाच्या अपघातात देखील यावर असलेल्या भारतीय क्रू मेंबर्स नी दाखविलेल्या प्रसंगावधनामुळे त्यांची स्तुती होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
 पाण्यातून किंवा हवेतून प्रवास करणं म्हणजे फार जोखमीची बाब आहे. कारण, या प्रवासांदरम्यान अपघात किंवा अपघातसदृश्य स्थिती निर्माण झाली तर लवकर मदत मिळणं फारच कठीण असतं. अमेरिकेत काल अशीच एक घटना घडली. अमेरिकेतील बाल्टिमोर येथे काल (26 मार्च) एक मालवाहू जहाज पुलावर आदळल्याची घटना घडली. या दुर्घटनेनंतर सहा जण बेपत्ता झाले होते. त्यापैकी दोन जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. उर्वरित बेपत्ता लोकांचा शोध सध्या थांबवण्यात आला आहे. अपघातग्रस्त कार्गो जहाजावर 22 क्रू मेंबर्स उपस्थित होते. हे सर्व सदस्य भारतीय असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेच्या काही वेळापूर्वीच क्रू मेंबर्सनी प्रसंगावधान दाखवत मेडे कॉलद्वारे शेकडो लोकांचा जीव वाचवला आहे.

मेडे कॉल हा शब्द ऐकल्यानंतर अनेकांना असं वाटतं की, तो मे महिन्याशी संबंधित आहे. पण, वस्तुस्थिती वेगळी आहे. मेडे हा शब्द फ्लाईट पायलट किंवा जहाजाच्या कॅप्टनकडून आपत्कालीन परिस्थितीत वापरला जातो. हा शब्द मायदेझ (m’aidez) किंवा मायडर (m’aider) या फ्रेंच शब्दांची इंग्रजी आवृत्ती आहे. ‘मला मदत करा’ असा याचा अर्थ होतो. फ्लाईट पायलट किंवा जहाजाच्या कॅप्टनला एखाद्या गंभीर धोक्याची जाणीव होते आणि तो टाळण्याचा कोणताही दुसरा मार्ग नसतो तेव्हा ते मेडे कॉलचा वापर करतात. पायलट किंवा कॅप्टन विमानतळावर किंवा बंदरावर असलेल्या सेंटरला एक डिस्ट्रेस कॉल करतात. तिथून प्रतिसाद मिळताच तो तीन वेळा मेडे म्हणतो. हे ऐकून विमानतळावर किंवा बंदरावर उपस्थित अधिकारी सतर्क होतात आणि पायलट किंवा कॅप्टनने दिलेली माहिती लक्षपूर्वक ऐकतात.

आपत्कालीन परिस्थितीची माहिती देण्यासाठी 1920 मध्ये मेडे या शब्दाचा वापर सुरू झाला. लंडनमधील क्रॉडॉन विमानतळावरील वरिष्ठ रेडिओ अधिकारी फ्रेडरिक स्टॅनले मॉकफोर्ड यांनी सर्वात अगोदर हा सिग्नल वापरला होता. आणीबाणीच्या वेळी पायलट वापरू शकतील असा शब्द सुचवण्याची जबाबदारी मॉकफोर्ड यांच्याकडे दिली होती. त्यांनी फ्रेंच शब्द ’m’aider’ (इंग्रजीमध्ये मेडे) याची निवड केली.

मंगळवारी यूएसएमधून श्रीलंकेला जाणाऱ्या कंटेनर जहाजाच्या क्रू मेंबर्सना धोका लक्षात येताच त्यांनी मेडे कॉल केला होता. त्यानंतर बाल्टिमोरमधील फ्रान्सिस स्कॉट की ब्रिजवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. यामुळे शेकडो लोकांचा जीव वाचला.

क्रू मेंबर्सच्या हुशारीमुळे शेकडो लोकांचा जीव वाचला असल्याच्या वृत्ताला मेरिलँडचे गव्हर्नर वेस मूर यांनीही दुजोरा दिला आहे. त्यांच्या मते, क्रू मेंबर्स खरे हिरो आहेत. ते म्हणाले, “जहाजाची धडक होऊन फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज कोसळण्याच्या काही वेळापूर्वी जहाजावरील क्रूने मेडे कॉल केला होता. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना पुलावरील वाहनांची रहदारी थांबवता आली. त्यामुळे क्रू मेंबर्स हे खरे हिरो आहेत. काल रात्री त्याने अनेकांचा जीव वाचवला.”

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close