क्राइम

या कारणाने केली भाच्याने मामीची हत्या ; स्प्रेवरून लागला छडा

Spread the love

मुंबई  / नवप्रहार डेस्क

                    त्या महिलेच्या मृतदेहाची पोलिसांनी ओळख पटवली असून पोलिसांनी मृत महिलेच्या भाच्याला दिल्ली वरून अटक केली आहे. नजाबुद्दीन असे भाच्याने नाव असून सायराबानो असे मृत महिलेचे नाव आहे. ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे तपासात समोर आले आहे.

 पोलिसांना नालासोपाऱ्यात  अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला होता. या महिलेची ओळख पटत नव्हती. या महिलेच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केले होते.  अनैतिक संबंधातून भाच्याने मामीची हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे.

दरम्यान, मतदार यादी आणि घटनास्थळावरुन भेटलेल्या स्प्रेवरुन या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपीला दिल्लीहून अटक केली आहे. आरोपी नजाबुद्दीन आणि मयत सायराबानू यांचे मागील दोन वर्षांपासून अनैतिक संबंध होते.

मात्र, नजाबुद्दीनने लग्न केल्याने सायराबानू संतप्त झाली. नजाबुद्दीनच्या लग्नामुळे त्याचे सायराबानूसोबत खटके उडू लागले. त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यामुळे नजाबुद्दीनने तिची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close