राज्य/देश

या कारणाने अजित दादा गटाने केली पडळकर यांचेवर कारवाईची मागणी 

Spread the love

पडळकरां विरोधात राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने 

मुंबई / नवप्रहार मीडिया

पडळकर नेहमीच पवार कुटुंबावर टीका करत असतात. यावेळी देखील त्यांनी पवार कुटुंबावर बोचरी टीका केल्याने अजित दादा संतापले असून त्यांनी पडळकरांच्या टिकेवरून भाजपा ला आम्ही सत्तेत आहोत असे विसरून जाऊ असा सज्जड दम दिला आहे. तर अजित दादा गटाकडून राज्यात विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आलं8 आहे.  पडळकरांवर कारवाईची मागणी केली आहे.

पुण्यासह अकोला आणि इतर काही ठिकाणी अजित पवार गटाने गोपीचंद पडळकरांविरोधात आंदोलन केलं आहे. दरम्यान, अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट लिहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा दिला आहे. गोपीचंद पडळकरांना आवर घालावी, अन्यथा आम्ही सत्तेत आहोत, हे विसरून जाऊ, अशा शब्दांत मिटकरींनी इशारा दिला.

‘एक्स’वर लिहिलेल्या पोस्टमध्ये अमोल मिटकरी म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या मंगळसुत्र चोराविरुद्ध अकोल्यात मदनलाल धिंग्रा चौकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याला (गोपीचंद पडळकर) तत्काळ आवर घालावी, नाहीतर आम्ही सत्तेत आहोत हे विसरून जाऊ.’

गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?

गोपीचंद पडळकर म्हणाले, “धनगर समाजाबाबत अजित पवारांची भावना स्वच्छ नाही. ते लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही धनगर आरक्षणाबाबत पत्र दिलं आहे.”

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close