विदेश

या देशात चक्क बायको मिळते भाड्याने 

Spread the love

इंडोनेशिया / नवप्रहार इंटरनॅशनल डेस्क 

                   काही लोकांची मानसिकता असते त्यांच्या कडे भरपूर पैशे असून देखील ते स्वतःचे घर बांधत नाहीत. संपूर्ण आयुष्य ते भाड्याच्या घरात काढतात. त्या मागे काही कारणे असु शकतात. पण लग्न आणि  बायको हे सगळ्यांनाच स्वतःची असावी असे वाटते. अर्थात काही लोक असतात ज्यांचा हक्काच्या बायको शिवाय इतरांच्या बायकोवरही जीव जातो. पण तुम्हाला जर कोणी सांगितले की बायको भाड्याने मिळू शकते. शकते काय मिळतेच ! तर त्याचा तुमच्यावर विश्वास बसणार नाही. पण जगात असे ही काही देश आहेत ज्यात हा प्रकार चालतो. अहो चालतो काय तिथे तशी प्रथाच आहे.

 इंडोनेशिया हा त्यापैकीच एक. या देशात चक्क भाड्याने बायको मिळते. ती तुमची नवऱ्यासारखीच सेवा करते. इंडोनेशियात येणारा प्रवासी स्वतःच्या इच्छेप्रमाणे एक स्त्री निवडतो आणि काही काळासाठी तिला पत्नी म्हणून स्वीकारतो. हा प्रकार “प्लेजर मॅरेज” म्हणून ओळखला जातो.

प्लेजर मॅरेजचा बोलबाला

दक्षिण पूर्व आशियातील देशांमध्ये प्लेजर मॅरेजचे प्रमाण वाढत आहे. विशेषत: इंडोनेशियामध्ये हा प्रकार खूप दिसतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंडोनेशियामध्ये प्लेजर मॅरेज एक मोठा उद्योग बनला आहे. अनेक स्त्रिया आपला उदरनिर्वाह आणि पैसे कमावण्यासाठी प्लेजर मॅरेजमध्ये भाग घेतात. यामुळे इंडोनेशियाच्या पर्यटन क्षेत्राला आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळाली आहे.

कसं असतं प्लेजर मॅरेज?

इंडोनेशियामध्ये प्लेजर मॅरेज एक व्यवसाय बनला आहे. विशेषतः गावांतील महिला या व्यवसायाचा भाग बनल्या आहेत. बेरोजगारी आणि कमालीचं दारिद्रय यातून हा प्रकार उद्याला आला आहे. काही महिलांना त्यांच्या कुटुंबीयांकडून पैसे मिळवण्यासाठी या व्यवसायात भाग घेण्याचा दबाव असतो, तर काही महिलांनी स्वेच्छेने हा व्यवसाय स्वीकारला आहे. रियल इस्टेट उद्योगासारखे, येथे देखील दलाल आहेत जे प्रवाश्यांना त्यांच्या आवडीनुसार महिलांशी परिचय करून देतात आणि नंतर त्या दोघांचा विवाह होतो.

प्लेजर मॅरेज कसा होतो?

या कामासाठी या देशात एजन्सी आहेत. एका रिसॉर्टमध्ये या एजन्सी आलेल्या पर्यटक पुरुषांची स्थानिक महिलांशी परिचय करून देतात. त्यानंतर त्यांचा तात्पुरता विवाह होतो. तसा करार केला जातो. एकदा दोन्ही पक्षांचा सहमती होऊन, एक झटपट आणि अनौपचारिक विवाह समारंभ पार पडतो. त्यानंतर, पुरुषाला त्या महिलेला ताबडतोब रोख रक्कम चुकवावी लागते, या महिलेची ती किंमत असते.

ज्या महिलाही हा तात्कालिक विवाह करतात, त्यांना विदेशी पतींसोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतात आणि घरातील बाकीचे कामही करावे लागते. जसजसा पतीचा व्हिसा समाप्त होतो आणि प्रवासाचा कालावधी संपतो, तसतसे हे विवाह “ऑटोमॅटिक” संपला असे मानले जाते. म्हणजेच, विवाहाचा कालावधी फक्त प्रवासाच्या काळापुरता असतो आणि त्यानंतर तो संपलेला मानला जातो.

प्लेजर मॅरेजचे परिणाम

प्लेजर मॅरेज एक मोठा उद्योग बनला असला तरी, याच्या अनेक नैतिक, सामाजिक आणि कुटुंबीय परिणाम देखील होऊ शकतात. काही महिलांना हा व्यवसाय पैशांची कमाई करण्याचे एक साधन वाटत असला तरी, यामध्ये त्यांच्यावर होणारे दबाव आणि भावनिक ताण देखील असू शकतात. या प्रकारच्या विवाहांचे सामाजिक स्थान आणि परंपरांवर कसा परिणाम होईल, याबद्दल अनेक प्रश्न उभे राहतात. या शिवाय हा एक प्रकारचा वेश्या व्यवसायच असून महिलांचं त्यात शारीरिक शोषण केलं जातं.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close