क्राइम

या कारणाने मुलीने छाटले बापाचे गुप्तांग 

Spread the love

मुंबई /नवप्रहार ब्युरो

मुंबईच्या नालासोपारा येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे वडिलांच्या अत्याचारा मुळे थकलेल्या मुलीने त्याच्यावर चाकूने हल्ला करत त्याचे गुप्तांग छाटले आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास नालासोपारा पूर्वेच्या संतोषभवन येथे ही घटना घडली आहे. या हल्ल्यात मुलीचे वडील गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तसे मुलगी आणि बापाचे नाते वेगळे असते असे सांगतात.मुलांपेक्षा मुली वडिलांच्या फार जवळ असतात असे म्हटल्या जाते. पण सर्वच बाप चांगले असतात असे नाही . त्यात काही असे असतात ज्यांना पोटच्या मुली आणि अन्य महिलांमधील फरक समजत नाही. ते.मुलींना देखील उपभोगाची वस्तू समजतात. आणि त्यांच्यावर अत्याचार करतात.  बापाकडून होणाऱ्या नेहमीच्या अत्याचाराला त्रासून तरुणीने बापावर चाकूने हल्ला करत त्याचे गुप्तांग छाटले आहे.

24 वर्षीय तरुणी नालासोपारा पुर्वेच्या संतोषभुवन येथील सर्वोदनय नगर चाळीत रहात होते. तुळींज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्या आईने दुसरे लग्न केले होते. तिचे सावत्र वडील रमेश भारती हे मागील दोन वर्षांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. सोमवारी देखील त्यांनी तिच्यावर शरीरसंबंध बनविण्यासाठी दबाव टाकला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रमेश भारती याने शरीरसंबंधाची मागणी केल्यावर तिने हल्ल्याची योजना बनवली. हे करण्यासाठी लाज वाटते असे सांगून तिच्या वडिलांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि मग अचानक हल्ला केला आणि गुप्तांग कापून टाकले.

रक्तबंबाळ अवस्थेत रमेश भारती घराबाहेर गेला तेव्हा तिने रस्त्यात गाठून त्याच्यावर सपासप वार केले. माझ्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याने मी हल्ला केला असे तिने लोकांना सांगितले. हातात चाकू घेऊन फिरत असलेला या तरुणीची व्हिडियो देखील स्थानिकांना काढला आहे. सध्या तुळींज पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close